आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prashant Kishor Sharad Pawar Meet Has Nothing To Do With Third Front Against BJP। Sharad Pawar Delhi Residence Opposition Party Meeting Update | Farookh Abdullah Shatrughan Sinha Prashant Kishore

तिसऱ्या आघाडीची तयारी नाहीच:शरद पवारांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकांचा तिसऱ्या आघाडीशी काहीच संबंध नाही; आज पुन्हा विरोधकांची महत्वपूर्ण बैठक

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर आणि इतर विरोधकांमध्ये बैठकांवर बैठका होत आहेत. याच स्वरुपाची बैठक आज दुपारी 4 वाजता देखील दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी होणार आहे. परंतु, या बैठकांचा आणि तिसऱ्या आघाडीचा काहीही संबंध नसल्याचे आता समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत प्रशांत किशोरांचे सल्ले घेऊन शरद पवार आगामी लोकसभेसाठी तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा होती.

बैठकांशी संबंधित नेत्यांची स्पष्टीकरण
हिंदी वृत्तवाहिनी एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार, बैठकीशी संबंधित एका नेत्याने सांगितले की शरद पवारांच्या घरी बैठक निश्चितच होत आहे. पण, या बैठकांचा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीचा काहीही संबंध नाही. 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी तिसऱ्या आघाडीची तयारी होत नाही.

कोरोनानंतर विरोधकांची पहिलीच प्रत्यक्ष चर्चा
कोरोना संकटात सरकार आणि विरोधकांच्या सर्वच महत्वाच्या बैठका ऑनलाइन आणि व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून झाल्या. अशात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन प्रत्यक्ष भेटी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही बैठक राष्ट्र मंच या बॅनरखाली होणार आहे. या बैठकीमध्ये 15 विरोधी पक्षांचे नेते सहभागी होऊ शकतात. राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून तिसऱ्या आघाडीच्या मोर्चेबांधणीला नकार दिला जात असला तरीही भविष्यात याची शक्यता नकारता येत नाही.

बैठकींवर 3 शक्यता
1. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली.
2. शरद पवार तिसऱ्या आघाडीमध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहेत.
3. पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे निकाल पाहता प्रशांत किशोर ममतांना या आघाडीच्या नेत्या बनवण्याचा प्रस्ताव देऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...