आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉम्बफेक:उत्तर प्रदेशच्या BJP नेत्याच्या मुलाच्या कारवर बॉम्बहल्ला, उमेश हत्याकांडानंतर 42 दिवसांनी पुन्हा थरार​​​​​​​

प्रयागराज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुचाकीस्वार तरुण बॉम्ब फेकल्यानंतर पळून जाताना सीसीटीव्हीत कैद झाला.  - Divya Marathi
दुचाकीस्वार तरुण बॉम्ब फेकल्यानंतर पळून जाताना सीसीटीव्हीत कैद झाला. 

प्रयागराजमध्ये उमेश पाल हत्याकांडानंतर पुन्हा एकदा बॉम्बहल्ल्याचा थरार घडला आहे. भाजपच्या जिल्हा मंत्री विजयलक्ष्मी चंदेल यांच्या मुलावर झुंसी भागात बॉम्बने प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांच्या कारवर 2 बॉम्ब फेकण्यात आला. त्यात चंदेल यांचे सुपुत्र विधान सिंह थोडक्यात बचावले.

या घटनेचे CCTV फुटेजही समोर आले आहे. विधान सिंह सफारी कारमधून गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास आपल्या मावशीच्या घरी गेले होते. कारमध्ये त्यांचा मित्र प्रांशु यादवही होता. ते आपल्या मावस भावाची वाट पाहत होते. तेव्हा 2 दुचाकीवरून आलेल्या 4 तरुणांनी त्यांच्या कारवर बॉम्ब फेकला. चारही तरुणांनी आपल्या तोंडाला रुमाल बांधला होता.

राजू पाल हत्याकांडाचा साक्षीदार उमेश पाल याची 24 फेब्रुवारीला प्रयागराजमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याच्या कार व अंगरक्षकावरही बॉम्बफेक करण्यात आली होती. या प्रकरणात गँगस्टर अतिकचा मुलगा असद व त्याच्या सहकाऱ्यांचा हात होता. त्यानंतर 42 दिवसांनी शहरात पुन्हा एकदा असाच हल्ला झाला आहे.

आरोपींचा CCTV च्या आधारावर शोध...

पोलिसांना हे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आढळले आहे. त्याद्वारे गुन्हेगारांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पोलिसांना हे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आढळले आहे. त्याद्वारे गुन्हेगारांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच कॉन्स्टेबलच्या मुलाशी झाला होता वाद

हल्ल्यानंतर विधान सिंह यांनी कारसह वेगात पळ काढला. त्यात त्यांची कार एका स्कूटीस्वार महिलेला धडकली. विधान सिंहांच्या मातोश्री विजयालक्ष्मी जिल्हा मंत्री आहेत. त्या ठाणेपूर ग्रामसभेच्या प्रमुखही आहेत. यासंबंधीच्या वृत्तानुसार, विधान सिंह यांचा काही दिवसांपूर्वी कौशांबीमध्ये तैनात कॉन्स्टेबल शिवबचन यादव यांचा मुलगा शिवम यादवसोबत वाद झाला होता. त्यानंतर कॉन्स्टेबल व त्याच्या मुलाने भाजप नेत्याच्या घरी जाऊन माफीही मागितली. विधान सिंह यांनी कॉन्स्टेबलच्या मुलावर मारहाणीचा आरोप केला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मुलावर हल्ला करणाऱ्यांवर व्हावी कठोर कारवाई - विजयलक्ष्मी

विजयलक्ष्मी यांनी सांगितले की, कॉन्स्टेबलच्या शिवम नामक मुलानेच हा हल्ला केला आहे. त्यानेच माझ्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो वाचला. हल्लेखोरांकडे शस्त्रेही होती. पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करावी.