आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pre monsoon Rains In 4 States Including Rajasthan, Madhya Pradesh, Delhi, Haryana Have No Relief Till 15

हवामान:राजस्थान, मध्य प्रदेशसह 4 राज्यांत मान्सूनपूर्व पाऊस, दिल्ली, हरियाणास 15 पर्यंत दिलासा नाही

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रचंड उष्णतेने हैराण असलेल्या उत्तर-मध्य भारतात मान्सून आणि मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा आहे. शनिवारी पश्चिमेकडील गोवा, मंुबई पार करून पुढे वाटचाल करणारा मान्सून रविवारीदेखील त्याच ठिकाणी राहिला. परंतु आता लवकरच मान्सून दक्षिण गुजरात, आंध्र, तेलंगण, महाराष्ट्रातील काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. सोबतच दक्षिण राजस्थान, गुजरात, पश्चिम-मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. हवेच्या पॅटर्ननुसार पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश भागात १५ जूनपर्यंत हवामानात बदल होण्याची शक्यता नाही. म्हणजेच तूर्त तरी या भागात उष्णतेपासून दिलासा नाही. १५ जूनच्या सायंकाळी किंवा १६ जूनला या राज्यांत वादळ येऊ शकते. उत्तर व मध्य राजस्थानात दोन दिवसांत पाऊस होऊ शकतो. बिहारमध्ये १५ जूनपासून हवेत बदल जाणवू लागेल. त्याच काळात उत्तर पश्चिम भारतात एका मध्यम स्वरूपाच्या पश्चिमी विक्षोभाची शक्यता आहे.

उष्णतेची लाट का ?
पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये पश्चिमेकडील वारे वेगाने वाहू लागले आहेत. त्यामुळे दिवसभर उष्णतेची लाट सुरू आहे. रात्रीदेखील उकाडा जाणवू लागला आहे.

झारखंडमध्ये १५ नंतर मान्सून पोहोचणार
हवामान विभागानुसार ४८ तासांत मान्सून कर्नाटकदरम्यान आंध्र, तेलंगण व महाराष्ट्राच्या काही भागात सक्रिय होईल. छत्तीसगड, आेडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारमध्ये १५ ते २० जूनदरम्यान मान्सून धडकेल.

बातम्या आणखी आहेत...