आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोएडा:गरोदर महिलेला अनेक रुग्णालयांनी अॅडमिट करण्यास दिला नकार, अखेर 13 तासानंतर ऑटोतच मृत्यू

नोएडा9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपचाराआभावी महिलेसह तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू

उत्तर प्रदेशात कोरोना संक्रमण वेगाने पसरत आहे. रुग्णालयातील कर्मचारी कोरोनाच्या भीतीने रुग्णांना हातदेखील लावण्यास तयार नाहीत. विशेष म्हणजे, जर रुग्ण हॉटस्पॉट परिसरातील असेल, तर रुग्णाला उपचार मिळणे कठीण झाले आहे. अशीच एक घटना नोएडामधून समोर आली आहे. कोरोनाच्या भीतीने येथील आठ महिन्यांच्या गरोदर महिलेला अनेक रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिला. अखेर 13 तासानंतर उपचाराअभावी त्या महिलेने ऑटोमध्येच शेवटचा श्वास घेतला. महिलेसह तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला. याप्रकरणी डीएम सुहास एल वाई यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गाजियाबादच्या खोडा कॉलनीतील रहिवासी नीलम कुमारी 8 महिन्यांच्या गरोदर होत्या. प्रसवपिडा सुरू झाल्यानंतर, शुक्रवारी सकाळी 6 वाजता ऑटोमधून त्यांना एका रुग्णालयात नेण्यात आले. नीलम यांचे पती बृजेंद्र एक मीडिया फर्मच्या मेंटिनेंस डिपार्टमेंटमध्ये काम करतात. तर, नीलम एक वायर मॅन्युफॅक्चरिंग यूनिटमध्ये काम करत होत्या. त्यांच्याकडे ईएसआय कार्ड असल्यामुळे, बृजेंद्र यांचा भाऊ शैलेंद्र कुमारने आपल्या ऑटोमधून नीलमला नोएडा सेक्टर 24 मधील ईएसआयसी हॉस्पीटलमध्ये नेले.

शैलैंद्र यांनी सांगितले की, तिथे 'ईएसआयमध्ये नीलम यांना काहीकाळ ऑक्सिजन लावली आणि नंतर सेक्टर 30 मधील जिल्हा रुग्णालया रेफर केले. परंतू, त्या हॉस्पीटलच्या स्टाफने त्यांना भरती करण्यास नकार दिला. स्टाफ म्हणाला की, तुम्ही कंटेन्मेंट झोन असलेल्या खोडामधून आला आहे, त्यामुळे तुम्ही तेथील रुग्णालयातच उपचार घ्या.'

यानंतर कुटुंबिय नीलम यांना घेऊन सेक्टर 51 मधील शिवालिक रुग्णालयात नेले. तिथे सांगण्यात आले की, महिलेची प्रकृती गंभीर आहे, तिला चांगल्या हॉस्पीटलमध्ये न्या. त्यानंतर 11 वाजता फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, तिथेही भरती करून घेतले नाही. शैलेंद्र म्हणाला- ‘स्टाफने सांगितले की, त्यांच्याकडे बेड आणि व्हेंटिलेटर नसल्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा. त्यानंतर सेक्टर 128 मधील जेपी रुग्णालयात नेण्यात आले, तिथेही भरती करुन घेतले नाही. तिथे सांगण्यात आले की, नीलममध्ये कोविड-19 लक्षणे आहेत, तिला शारदा किंवा ग्रेटर नोएडामधील जिम्समध्ये घेऊन जा.' ही दोन्ही कोव्हिड-19 रुग्णालये आहेत, पण त्या दोन्ही रुग्णालयात भरती करण्यास नकार दिल्याचा कुटुंबियांना दावा आहे.

डीएमने दिले चौकशीचे आदेश

याप्रकरणी गौतमबुद्धनगरचे जिल्हाधिकारी सुहास एल वाई यांनी प्रकरणासाठी एक कमेटीची स्थापन केली आहे. अपर जिल्हाधिकारी वित्त आणि महसुल मुनींद्र नाथ उपाध्याय आणि मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपक ओहरी यांना चौकशीचे आदेस देत , दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...