आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Preparation For Cabinet Reshuffle; Electoral Equation In 7 States May Change 24 Faces In The Ministry; News And Live Updates

मोदी - 2.0:कॅबिनेटमध्ये बदलाची तयारी; 7 राज्यांतील निवडणूक समीकरण बदलू शकते मंत्रालयातील 24 चेहरे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात संसदेचे पावसाळी अधिवेशन, जूनच्या अखेरीस बदल शक्य

येत्या १२ महिन्यांत ७ राज्यांत विधानसभा निवडणुका होतील. सध्या राज्यांपेक्षा दिल्लीतीच वातावरण तापले आहे. या निवडणुका आणि पुढील दोन वर्षे राजकीय घटनाक्रम साधण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्रिमंडळात बहुप्रतीक्षित फेरबदल करण्याची तयारी सुरू आहे. केंद्रात अनेक मंत्री ३-४ विभागांचे काम पाहत आहेत. अशात कॅबिनेट विस्तार होईल, असा कयास बऱ्याच दिवसांपासून होता. या विस्तारात ६-७ नवे चेहरे येतील तसेच काही मंत्र्यांची खाती बदलण्याची शक्यता आहे. जेथे निवडणुका आहेत त्या राज्यातील गणिते साधण्यासाठी हे फेरबदल व्यापक असतील. त्या अनुषंगाने जूनमध्ये आतापर्यंत पंतप्रधानांनी ४ मोठ्या बैठका घेतल्या आहेत. संघ नेत्यांशीही चर्चा झाली आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी नवीन रूपातील कॅबिनेट आकारला येऊ शकते.

भाजपला ७ पैकी ६ राज्यांतील सरकार वाचवायचे आव्हान आहे. फक्त पंजाबमध्येच काँग्रेस सरकार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल, गोवा व मणिपूरमध्ये भाजप सरकारे आहेत. उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यांत काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. मोदी सरकार या राज्यांना अधिक प्राधान्य देण्याचा प्रयत्न करेल. उत्तर प्रदेश व पंजाबला प्राधान्य असेल. कारण येथे ८ महिन्यांनी निवडणुका आहेत.

अनुप्रिया, ज्योतिरादित्यांच्या नावाची चर्चा, कदाचित शक्य
उप्रतील अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांना मंत्रिपदाची चर्चा सुरूच आहे. ज्योतिरादित्य शिंदे आणि जितिन प्रसादही रांगेत आहेत. सूत्रांनुसार, पाच वरिष्ठ मंत्र्यांमध्ये अचानक बंदल केला जाऊ शकतो. कृषी, शिक्षण, रेल्वे, नागरी विकास आणि नागरी उड्डयन अशा महत्त्वाच्या खात्यांत बदलांचे संकेत आहेत. तर, आरोग्य मंत्रालयात एखाद्या प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञास राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

या मंत्र्यांवर दुहेरी जबाबदारी

 • नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते परिवहन, राष्ट्रीय महामार्गशिवाय एमएसएमई आहे.
 • नरेंद्र तोमर कृषी व ग्रामीण विकास.
 • स्मृती इराणी यांच्याकडे वस्त्रोद्योगसह महिला व बालविकास खाते आहे.
 • डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे आरोग्याशिवाय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालय आहे.
 • प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरण, माहिती-प्रसारण व अवजड उद्योग खाते.
 • धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम व इस्पात.
 • रविशंकर यांच्याकडे कायदा मंत्रालयासह दूरसंचार मंत्रालय आहे.

काहींना बढती, काही नवे चेहरे
राज्य सरकार चालवण्याचा अनुभव असलेल्यांना संधी दिली जाऊ शकते. यात सुशील मोदी आणि फडणवीस यांच्यासह आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांचे नाव आहे. स्मृती इराणी यांच्यावर प्रमुख जबाबदारी देणे, अनिल बलुनी तसेच मीनाक्षी लेखी यांनाही संधी दिली जाऊ शकते.

बिहारमध्ये “आपले’ सरकार
भाजपचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदींना केंद्रात स्थान मिळू शकते. दुसरा पर्याय म्हणजे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना केंद्रात येण्याची ऑफर दिली जावी. असे घडले तर भाजपचा मुख्यमंत्री होणे शक्य.

देवेंद्र फडणवीस केंद्रात?
शिवसेना एनडीएमधून बाहेर पडल्यावर कंेद्रात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व कमी झाले आहे. शिवसेनेचे अरविंद सावंत अवजड उद्योगमंत्री होते. हेच पद माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...