आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमा सुरक्षा दलाच्या विस्तारित अधिकार:बीएसएफच्या 50 किमी क्षेत्रफळ विस्तारित अधिकाराची ब्लूप्रिंट तयार

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीमा सुरक्षा दलाच्या विस्तारित अधिकार क्षेत्राला परिभाषित करण्यासाठी विविध सीमेवरील राज्यांत संचलनाचा आराखडा तयार झाला आहे. त्यात चौक्या वाढणार आहेत. त्यासंबंधीचा आराखडा लवकरच गृह खात्याला सोपवला जाणार आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.पश्चिमेत पाकिस्तानकडून व पूर्वेला बांगलादेशकडून लागून सुमारे ६३०० किमी सीमा सुरक्षेची जबाबदारी बीएसएफकडे आहे. दलाची अधिकार कक्षा विस्तारणार आहे. त्यासाठी आवश्यक भौगोलिक स्थान व त्याचा ढाचा निश्चित करण्यात आला आहे. सीमेपलीकडे गुन्ह्यांच्या विरोधात कारवाईत सहभागी होणाऱ्या जवानांसाठी काही ठिकाणी चौक्या व इतर मदतीसाठी आवश्यक ठिकाणे निश्चित झाली आहेत. त्याबाबतच्या परवानगीचा प्रस्ताव योग्य वेळी केंद्रीय गृह खात्यासमोर मांडला जाईल.

बातम्या आणखी आहेत...