आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Preparing For A Major Attack On Terrorists; Citizens Should Not Leave Their Homes, Army Chiefs At The Border

पूंछमध्ये लष्कराचा अलर्ट:अतिरेक्यांवर मोठ्या हल्ल्याची तयारी; नागरिकांनी घराबाहेर पडू नये, लष्करप्रमुख सीमेवर

जम्मूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबरमध्ये प्रवासी कामगारांसह ११ सर्वसामान्य नागरिकांच्या अतिरेकी हल्ल्यातील मृत्यूमुळे वातावरण तणावपूर्ण असताना आता अतिरेक्यांवर मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू आहे. पूंछ जिल्ह्यातील मेंढर भागात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशी सार्वजनिक घोषणा करण्यात आली आहे. स्थानिक मशिदींतील लाउडस्पीकरवर लोकांनी रेशन आदीची व्यवस्था करून घरांतच थांबावे, अशी उद्घोषणा करण्यात आली आहे. या भागात लष्कराची विशेष दलेही तैनात करण्यात आली आहेत.

दरम्यान, लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे मंगळवारी एलओसीवरील चौक्यांवर गेले. पूंछ व राजौरीच्या जंगलांत ९ दिवसांपासून सुरू चकमकींच्या पार्श्वभूूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. नरवणेंनी एलएसीवरील स्थिती व घुसखाेरी रोखण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या मोहिमांचा आढावा घेतला. लष्करप्रमुखांनी व्हाइटनाइट कॉर्प्सच्या आघाडीवरील भागांचा दौरा केला. त्यांनी राजौरी व पूंछलाही भेट दिली. येथे मेंढर, सुरनकोट व थानामंडीच्या घनदाट जंगलांत लपलेल्या अतिरेक्यांशी ११ ऑक्टोबरपासून चकमक सुरू आहे. यात ११ ऑक्टोबरला ५ जवान शहीद झाले होते. दुसरीकडे, काश्मिरात नागरिकांच्या हत्यांची चौकशी एनआयए करणार आहे. या संबंधित इतर प्रकरणांचीही चौकशी केली जाईल. श्रीनगर, कुलगाम व इतर जागी टार्गेटेड किलिंगचा तपास एनआयएकडे सोपवण्यास गृह मंत्रालयाने संमती दिली. लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी एलओसीवर जाऊन पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...