आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Preparing To Raise Fat sugar Standards 8 Times In Packaged Foods; News And Live Updates

दिव्य मराठी बेक्रिंग:पाकीटबंद खाद्यान्नात फॅट-शुगरचे मानक 8 पट वाढवण्याची तयारी... हे धोकादायक, पण लोकांना कळू दिले जाणार नाही

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘एफएसएसएआय’च्या कार्य गटाचा दोन वर्षे जुन्या नियमांत बदल करण्याचा मसुदा

पाकीटबंद खाद्यपदार्थ नुकसानकारक आहेत की नाही, हे निश्चत करणारे मानक लागू करण्यापूर्वीच भारतीय खाद्य संरक्षण आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) ते बदलण्याची तयारी केली आहे. खाद्य नियामक एफएसएसएआयच्या कार्य गटाने जे नवे मानक तयार केले, ते पूर्वी निश्चित आणि डब्ल्यूएचओच्या मानकांपेक्षा आठ पटींपर्यंत अधिक आहेत. हे मानक नोव्हेंबरपर्यंत लागू करण्याचा मानस आहे. हे मानक लागू केले तर खाद्यपदार्थांतील फॅट, सोडियम (नमक) आणि साखर आंतरराष्ट्रीय मानकांपेक्षा कित्येक पटींनी अधिक असतील. तरीही ते ‘हेल्दी’ मानले जातील. यामुळे लोकांना आपण खात असलेले पदार्थ आरोग्यासाठी योग्य आहे किंवा नाही हे कळणारच नाही.

वास्तविक, दोन वर्षांपूर्वी जारी केलेल्या लेबलिंग अँड डिस्प्ले रेग्युलेशन ड्राफ्टमध्ये डब्ल्यूएचओने दिलेल्या मानकांनुसार सोडियम आणि शुगर मानकांवर अंमल करण्यात आला. फॅटच्या मानकांमध्येच थोडी शिथिलता मिळाली होती. सूत्रांच्या मते इंडस्ट्रीतील दबावामुळे हा नियम लागू झाला नाही. डिसेंबर २०२० मध्ये एफएसएसएआयने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले की, या मानकांमुळे देशात विकले जाणारी ९० टक्क्यांहून अधिक उत्पादने ‘अनहेल्दी” श्रेणीत जातील. त्यानंतर एफएसएसएआयने मानकांच्या पुनरावलोकनासाठी सहा सदस्यीय गट बनवला. सूत्राने सांगितले की, या गटाने जे नवे मानक बनवले आहेत त्यात आठ पटीपर्यंत शिथिलता दिली आहे. जुन्या मानकांनुसार उत्पादन केले जाऊ शकत नसल्याने मानके शिथिल करावीत, अशी कंपन्यांची मागणी आहे.

अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमुळे गंभीर आजारांचा धोका
फूड अॅक्टिव्हिस्ट आणि ब्रेस्टफीड प्रमोशन काैन्सिल ऑफ इंडियाचे समन्वयक डॉ. अरुण गुप्ता म्हणाले की, एखादे उत्पादन हानिकारक आहे हे खरेदीदाराला माहीत असावे. जसे की तंबाखूचे उत्पादन. जास्त साखर, मीठ आणि फॅट असलेले उत्पादन अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आहेत. यामुळे कर्करोग, लठ्ठपणा, हायपरटेन्शन व मधुमेहाचा धोका असतो. अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमुळे या रोगांचा धोकाही १० टक्क्यांनी वाढतो.

बातम्या आणखी आहेत...