आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या गेल्या वर्षीच्या पंजाब दौऱ्यावेळी सुरक्षेत चूक प्रकरणीी:दाेषींवर कारवाईची तयारी, 9 पोलिस अधिकारी दोषी

चंदीगड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गेल्या वर्षीच्या पंजाब दौऱ्यावेळी सुरक्षेत चूक झाल्याप्रकरणी ९ पोलिस अधिकारी दोषी आढळले आहेत. यात तत्कालीन मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी, डीजीपी एस. चटोपाध्याय, वरिष्ठ पोलिस अधीक्षक हरमनदीप सिंह, डीआयजी सुरजित सिंह यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी मोदी पंजाबच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा शेतकऱ्यांनी रस्त्यातच त्यांचा ताफा अडवला होता. जवळपास २० मिनिटे पंतप्रधानांचा ताफा अडकला होता.

५ सदस्यीय समिती स्थापन
प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाने ५ सदस्यीय समिती स्थापन केली. समितीने आपल्या अहवालात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना सुरक्षेत चूक केल्याचे दोषी ठरवले. त्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी पंजाबचे मुख्य सचिव विजयकुमार जंजुआ यांना कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. तथापि, अहवालात राज्य सरकारकडून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास उशीर झाल्याचा उल्लेखही आहे.

बातम्या आणखी आहेत...