आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Preparing To Win Gujarat Karnataka Policy Of Modi And Yogi, Early Elections Possible|Marathi News

नमोनीती:यूपीतील लाटेवर स्वार होत गुजरात-कर्नाटक जिंकण्याची तयारी, मुदतपूर्व निवडणुका शक्य

अहमदाबाद/ लखनऊ/बंगळुरू7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशसह ४ राज्यांत विजयाची गुढी रोवल्यानंतर भाजप याआधारे आगामी निवडणुका जिंकण्याच्या तयारीत आहे. निकालानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादेत १० किमीचा रोड शो केला. भाजप नेत्यांशी गुजरात निवडणुकीवर चर्चा केली. मोदी म्हणाले की, सज्ज राहा. निवडणुका कधीही होतील. सूत्रांच्या मते २७ मे ते जून २०२२ च्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतात. गुजरात विधानसभेचा कार्यकाळ डिसेंबरपर्यंत आहे. तिकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनीही मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत दिले आहेत.

निकालानंतर आपनेही कंबर कसली, तिरंगा यात्रा काढणार, मात्र काँग्रेसमध्ये भांडण
गुजरात: निवडणूकपूर्व राजकीय नियुक्त्या एप्रिलमध्ये राज्याची विविध मंडळे, महामंडळांत १०० ते १५० लोकांना चेअरमन आणि संचालक करण्याची तयारी सुरू आहे. यानंतर निवडणूक लागू शकते. यातून आप व काँग्रेसला तयारीची संधी मिळणार नाही.

१६ मार्चला शपथ, १३ रोजी केजरीवाल करतील रोड शो
आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान १६ मार्च रोजी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. हा सोहळा शहीद भगतसिंग यांचे वडिलोपार्जित गाव खटकड कला येथे होईल. १३ मार्चला केजरीवाल रोड शो करतील.

पश्चिमेत मुस्लिमबहुल भागात सपाला यश; शेतकऱ्यांची नाराजी उरली तीन जिल्ह्यांपुरतीच... देश-विदेश भगव्या टोपीद्वारे हिंदुत्वाचा संदेश : गुजरातेत मोदी भगव्या टोपीत दिसले. ही टोपी हिंदुत्वाचा संदेश देण्यासाठी भाजपच्या ड्रेस कोडचा भाग असेल. पंतप्रधानांनी आईचा आशीर्वाद घेण्यासह रात्रीचे जेवणही केले.

काँग्रेस : पराभवानंतर पुन्हा वाद सुरू
मोठ्या पराभवानंतर काँग्रेसचा असंतुष्ट जी-२३ सक्रिय झाला. कपिल सिब्बल, मनीष तिवारी, आनंद शर्मांसह अनेक नेते गुलाम नबी आझाद यांच्या घरी जमले. आझाद म्हणाले, पराभवामुळे मनोभंग झाला आहे.

आप : पंजाबचा आनंदोत्सव गुजरात-यूपीत
आपने पंजाबमध्ये मिळवलेला विजय राष्ट्रीय स्तरावर नेण्याची तयारी सुरू केली आहे. गुजरात, यूपीत तिरंगा यात्रेसह सदस्यत्व मोहीम सुरू करणार. त्यासाठी अनेक नेत्यांना गुजरातला पाठवण्यात आले आहे.

यूपी : महिला डेप्युटी सीएमची चर्चा यूपी सरकारची रचना २०२४ ची निवडणूक लक्षात घेऊन केली जाईल. पक्ष दलित मतपेढी बळकट करण्यासाठी माजी राज्यपाल बेबीराणी मौर्य व ओबीसी मते मिळवण्यासाठी स्वतंत्र देव यांना डेप्युटी सीएम करू शकतो.

बातम्या आणखी आहेत...