आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • President Election Updates । NDA And UPA Do Not Have Majority, Know About Kingmaker Regional Parties

राष्ट्रपती निवडणूक:NDA आणि UPA दोघांकडेही नाही स्पष्ट बहुमत, जाणून घ्या... प्रादेशिक पक्षांची भूमिका आणि निकालावरील परिणाम

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी NDA बहुमताच्या अगदी जवळ आहे. विरोधी पक्षही स्वतःला मजबूत म्हणवून घेत आहेत, पण दोघांकडे पुरेसे बहुमत नाही. अशा परिस्थितीत जगनमोहन रेड्डी, नवीन पटनायक आणि केसीआर यांची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यांच्याशिवाय यूपीए आणि एनडीएचा मार्ग सोपा होणार नाही. छोट्या प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

एनडीए बहुमतापासून 13 हजार मतांनी दूर आहे. रेड्डी किंवा पटनायक यापैकी एकाचा पाठिंबा असेल तर विजय निश्चित होईल. 2017 मध्ये या दोघांनी एनडीएला पाठिंबा दिला होता. जाणून घेऊया, 5 वर्षांनंतर आता 2022च्या राष्ट्रपती निवडणुकीचे चित्र कसे आहे.

सर्वप्रथम, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याबद्दल जाणून घेऊयात... विरोधी पक्षाच्या वतीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नवीन पटनायक यांना निमंत्रण दिले आहे. दुसरीकडे भाजपनेही बडे नेते अश्विनी वैष्णव यांना पटनायक यांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी दिली आहे.

2012, 2017 प्रमाणेच 2022च्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही नवीन पटनायक यांची मागणी वाढली आहे. त्यांना 30 हजारांहून अधिक मूल्याची मते आहेत.

BJD केंद्राच्या राजकारणात फारशी सक्रिय नाही

केंद्रीय पातळीवर पटनायक यांचा पक्ष बिजू जनता दल अखेरच्या वेळी अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये सहभागी होता. तेव्हापासून BJD केंद्रातील कोणत्याही सरकारमध्ये सहभागी नाही. म्हणजेच जवळपास 20 वर्षे पटनायक यांची मध्यवर्ती राजकारणात फारशी भूमिका नसली, तरी सर्व पक्षांमध्ये समन्वय चांगला आहे.

2012 आणि 2017 मध्ये बीजेडीची भूमिका

 • 2012च्या निवडणुकीत नवीन पटनायक यांच्या सूचनेनुसार NDAने पीए संगमा यांना उमेदवारी दिली होती.
 • संगमा यांचा यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांच्याकडून पराभव झाला.
 • 2017 मध्ये पटनायक यांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला होता.

NDAला मिळू शकते रेड्डी यांची साथ

आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याबद्दल जाणून घेऊयात. जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला 40 हजारांहून अधिक मूल्याची मते आहेत. एनडीएचे सर्वोच्च नेते जगन मोहन रेड्डी यांच्या संपर्कात आहेत. रेड्डी यांचा पाठिंबा NDAला मिळू शकतो. मात्र, अद्यापपर्यंत त्याची अधिकृत घोषणा रेड्डी यांनी केलेली नाही.

टीआरएसने अद्याप आपले पत्ते उघडले नाहीत

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांनी अद्याप त्यांचे पत्ते उघडलेले नाहीत. मात्र, तेलंगणा दौऱ्यावर गृहमंत्री ज्या पद्धतीने टीआरएस सरकारवर हल्लाबोल करत आहेत, त्यावरून भाजपचा मार्ग छोट्या पक्षांमध्ये टीआरएसला सोबत घेऊन चालण्याच्या मार्गापेक्षा वेगळा असल्याचे दिसून येत आहे. रेड्डी आणि पटनायक यांच्यासोबतच NDA विजयाचे अंतर वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

2017च्या तुलनेत बदललेली समीकरणे

 • भाजपकडे शिवसेना आणि अकाली दल असे मित्रपक्ष होते.
 • तामिळनाडूमध्ये एआयडीएमके सत्तेबाहेर आहे.
 • राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता नाही.
 • मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या आमदारांची संख्या घटली आहे.
 • 2017 मध्ये 21 राज्यांमध्ये एनडीएचे सरकार होते.
 • आता 17 राज्यांमध्ये एनडीएची सरकारे आहेत.
 • भाजपकडे आता महाराष्ट्र, तामिळनाडू आणि झारखंडही राहिलेले नाहीत.
बातम्या आणखी आहेत...