आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • President Election West Bengal Cm Mamata Banerjee Will Attend A Joint Meeting With The Cm And Leaders Of Opposition At Delhi Constitution Club On June 15

मोर्चेबांधणीला सुरुवात:राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींनी 8 मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षांच्या 22 नेत्यांना लिहिले पत्र

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुक होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मजबूत आणि प्रभावी विरोधासाठी पुढाकार घेतला असून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यासाठी ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या 22 नेत्यांना आणि 8 विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 15 जून रोजी होणाऱ्या संयुक्त बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लब दिल्ली येथे ही बैठक बोलावण्यात आली आहे.

ममता बॅनर्जी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहिले आहे. तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह आणखी 22 नेत्यांना ममता यांनी पत्र लिहले असून, येत्या 15 जूनला दिल्लीत बैठकीला येण्याचे आमंत्रण दिले आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांना विरोधक उमेदवारी देऊ शकतात

शुक्रवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि DMK, CPI, CPI(M) आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांशी चर्चा केली. वृत्तानुसार, या संभाषणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांसाठी समान उमेदवार उभे करण्याबाबत चर्चा केली. खरगे यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशीही या मुद्द्यावर फोनवरून चर्चा केली आहे.

कोविंद यांचा कार्यकाळ 25 जुलै रोजी संपतोय

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलैला मतदान होणार आहे, तर निकाल 21 जुलैला लागणार आहे. राज्यघटनेच्या नियमांनुसार, देशातील विद्यमान राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपण्यापूर्वी पुढील राष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 25 जुलै रोजी संपत आहे.

एनडीए मजबूत

एनडीए बहुमताच्या अगदी जवळ आहे. त्यासाठी बीजेडीचे नवीन पटनायक आणि वायएसआरसीचे जगनमोहन रेड्डी यांच्या पाठिंब्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनायक आणि जगन मोहन रेड्डी यांचीही भेट घेतली आहे. मात्र, उमेदवाराचे नाव समोर आल्यानंतरच पाठिंब्याबाबत निर्णय घेण्याचे दोघांनी सांगितले आहे. गेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएची कामगिरी चांगलीच होती. रामनाथ कोविंद यांना 65.35% मते मिळाली. यावेळीही त्याची पुनरावृत्ती करण्याचा एनडीएचा प्रयत्न आहे.

ममता यांच्या यादीत 'या' नेत्यांचे नावे

1. अरविंद केजरीवाल (मुख्यमंत्री, दिल्ली)

2. पिनाराई विजयन (मुख्यमंत्री, केरळ)

3. नवीन पटनायक (मुख्यमंत्री, ओडिशा)

4. कलवकुंतला चंद्रशेखर राव (मुख्यमंत्री, तेलंगणा)

5. थिरू एमके स्टॅलिन (मुख्यमंत्री, तामिळनाडू)

6. उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र)

7. हेमंत सोरेन (मुख्यमंत्री, झारखंड)

8. भगवंत सिंग मान (मुख्यमंत्री, पंजाब)

9. सोनिया गांधी (अध्यक्ष, काँग्रेस)

10. लालू प्रसाद यादव (अध्यक्ष, राजद)

11. डी. राजा (सरचिटणीस, सीपीआय)

12. सीताराम येचुरी (महासचिव, सीपीआयएम)

13. अखिलेश यादव (अध्यक्ष, समाजवादी पक्ष)

14. शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी)

15. जयंत चौधरी (राष्ट्रीय अध्यक्ष, RLD)

16. एचडी कुमारस्वामी (कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री)

17. एचडी देवेगौडा (खासदार, भारताचे माजी पंतप्रधान)

18. फारुख अब्दुल्ला (अध्यक्ष, JKNC)

19. मेहबूबा मुफ्ती (अध्यक्ष, पीडीपी)

20. एस. सुखबीर सिंग बादल (अध्यक्ष, शिरोमणी अकाली दल)

21. पवन चामलिंग (अध्यक्ष, सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट)

22. के एम कादर मोहिद्दीन (अध्यक्ष, IUML)

बातम्या आणखी आहेत...