आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांना आपला उमेदवार जिंकून आणणे जवळपास अशक्य आहे. सोबत १८ पक्ष असल्याचा दावा आहे. मात्र, या पक्षांच्या मतांचे मूल्य ३,८१,०५१ आहे. जिंकण्यासाठी ५,४०,०६५ पेक्षा जास्त मते हवीत. यात बिजद, आप, टीआरएस व शिरोमणी अकाली दल जोडल्यास आकडा ४,५९,८३१ पर्यंत जाईल. वायएसआरसीपी, बसप आणि एआयएमआयएमचा समावेश केल्यावरही ५,१२,४३४ पर्यंत पोहोचेल. एनडीएच्या मतमूल्यापेक्षा २० हजार कमी व जिंकण्यासाठी २७,६३१ पेक्षा मतमूल्य आणखी हवीत. यात अपक्षांना जोडले तरी २२,०४२ मतांचे मूल्य कमी राहील.
विरोधी पक्षांची जुळवाजुळव आणि गणित समजून घ्या १८ विरोधी पक्षांच्या २१९ खासदारांचे मतमूल्य = १,५३,३०० १८ पक्षांचे एकूण १५५० आमदारांचे मतमूल्य = २,२७,७५१ एकूण आकडा = ३,८१,०५१ सोबत असलेले १८ पक्ष ; काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी,सपा,सीपीआय(♦एम), अाययूएमएल, सीपीआय, अारएसपी, जेडीएस, आरएलपी, झामुमो, राजद, नॅशनल काॅन्फरन्स, पीडीपी, सिक्कीम डेमाक्रेटिक फ्रंट, सीपीअाय (एमएल). सोबत नसलेले ४ पक्ष... बिजद, टीआरएस, अकाली दल व अाप. ४८ खासदारांचे मूल्य = ३३,६०० ३७५ आमदारांचे = ४५,१८० एकूण मतांचे मूल्य= ७८,७८० निश्चित भूमिका नाही... वायएसआर, बसपा, एआयएमआयएम. ३७ खासदारांचे मूल्य= २५,९०० १७० आमदारांचे = २६,७०३ एकूण मतांचे मूल्य= ५२,६०३ २५ पक्षांचे एकूण मूल्यांत ३०४ खासदार व २०९५ आमदारांचे एकूण मूल्य=५,१२,४३४. {जिंकण्यास ५,४०,०६५ पेक्षा जास्त हवे.
एनडीए बळकट...५.३२ लाख मतांचे मूल्य सत्ताधारी आघाडीकडे
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एकूण ७६७ खासदार आणि ४०३३ आमदार मतदान करतील. एकूण मतांचे मूल्य १०,८०,१३१ आहे. एनडीएच्या ४४८ खासदार आणि १७३७ आमदारांच्या मतांचे मूल्य ५,३२,१३९ होते. म्हणजे, जिंकण्यासाठी त्यांना ७,९२६ मतांची आणखी आवश्यकता आहे. सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसकडे ८२ खासदारांचे ५७,४०० व ६९२ आमदारांचे ८८,३८१ मतमूल्य आहे. म्हणजे, त्यांचे एकूण मतांचे मूल्य १,४५,७८१ आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.