आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Presidential Oath | Murmu Will Be Administered The Presidential Oath By The Chief Justice Today

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज घेणार शपथ:सरन्यायधीश देणार राष्ट्रपतिपदाची शपथ; सोहळ्यात संथाली आदिवासी संस्कृतीची दिसणार झलक

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

द्रौपदी मुर्मू सोमवारी देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्याकडून त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल. यासह त्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा इतिहास रचणार आहेत. त्यांच्या आधी २००७ मध्ये प्रतिभाताई पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. मुर्मूंचे कुटुंबीय ओडिशातील रायरंगपूरहून दिल्लीत पोहोचले आहेत. मुर्मूंची वहिनी सुकरी टुडू यांनी त्यांच्यासाठी संथाली साडी आणली आहे. मुर्मू ही साडी परिधान करून शपथ घेऊ शकतात. पूर्व भारतात, संथाली साडी सणाच्या दिवशी परिधान केली जाते. या सोहळ्यात संथाली आदिवासी संस्कृतीची झलक दिसू शकते.

मुलगी इतिश्री आणि जावईही दिल्लीत :
मुर्मू यांची बँक अधिकारी मुलगी इतिश्री आपले पती गणेश हेम्ब्रमसोबत दिल्लीत पोहोचली आहे. इतिश्री भुवनेश्वरमध्ये राहते. मुर्मू यांच्या कुटुंबातून फक्त त्यांचा भाऊ, वहिनी, मुलगी आणि जावई शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.

गावापासून राष्ट्रपती भवनापर्यंत: २० जून १९५८ रोजी मुर्मू यांचा जन्म ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावातील संथाल कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा आणि वडील दोघेही गावचे प्रमुख होते. मुर्मू यांचे सुरुवातीचे शिक्षण उपरबेडा गावातील शाळेत झाले. वडील बिरंची नारायण टुडू यांनी मुलीला शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले.

घरी शाळा उघडली:
पती आणि दोन मुलांच्या मृत्यूनंतर, द्रौपदी मुर्मू यांनी स्वतःच्या घरात एक शाळा उघडली, जिथे त्या मुलांना शिकवत असत. त्या बोर्डिंग स्कूलमध्ये अजूनही मुलं शिकतात.

सलग दहाव्यांदा २५ जुलैला शपथ:
मुर्मू या २५ जुलैला शपथ घेणाऱ्या दहाव्या राष्ट्रपती असतील. १९७७ नंतर प्रत्येक वेळी राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा २५ जुलै रोजी होत आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी २६ जानेवारी १९५० रोजी शपथ घेतली. त्याच दिवशी भारत प्रजासत्ताक झाला. दुसऱ्यांदा निवडणूक जिंकल्यानंतर ते मे १९६२ पर्यंत या पदावर राहिले. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी १२ मे १९६२ रोजी शपथ घेतली आणि १३ मे १९६७ पर्यंत पदावर राहिले. झाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद यांचे निधन झाल्याने त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊ शकला नाही. सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी २५ जुलै १९७७ रोजी शपथ घेतली. त्यानंतर २५ जुलै रोजी ग्यानी झेल सिंग, आर वेंकटरामन, शंकर दयाळ शर्मा, केआर नारायणन, एपीजे अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील, प्रणब मुखर्जी आणि रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.

सकाळी ९:२५ वा.: मुर्मू राष्ट्रपती भवनात पोहोचतील. गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल.
१०:१५ वा.: सरन्यायाधीश एन. व्ही.रमणा शपथ देतील.
११:०० वा. : मावळत्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती भवनातून निरोप.

जिवंत लोकशाहीला प्रणाम : कोविंद
रामनाथ कोविंद यांनी शेवटच्या दिवशी राष्ट्रपती म्हणून देशाला संबोधित केले. ते म्हणाले, गावातील साधारण कुटुंबातून आलेले रामनाथ कोविंद देशवासीयांना संबोधित करत आहे, यासाठी मी देशाच्या जागरूक लोकशाही व्यवस्थेच्या शक्तीला नमन करतो. माझा ठाम विश्वास आहे की, २१ वे शतक भारताचे व्हावे म्हणून आपला देश सक्षम होत आहे.

बातम्या आणखी आहेत...