आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Prevented 38 Thousand Deaths, 14 To 29 Million Fewer Patients; Benefited From Various Measures Because Of Lockdown, Center Claim

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्राचा दावा:38 हजार मृत्यू रोखले, 14 ते 29 लाख कमी रुग्ण; लाॅकडाऊनसह विविध उपायांमुळे फायदा झाला

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरात एकाच दिवसात आजवरचे विक्रमी बाधित, 24 तासांत जगात 3 लाख 7,930 रुग्ण आढळले

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन व इतर उपायांमुळे ३७ हजार ते ३८ हजार मृत्यू कमी झाले आहेत. तसेच १४ ते २९ लाखांपर्यंत कमी रुग्ण आढळले आहेत.

सोमवारी लाेकसभेत आरोग्यमंत्री म्हणाले, देशात प्रती १० लाख लोकसंख्येमागे ३,३२८ रुग्ण आणि ५५ मृत्यू झाले आहेत. हे जगात सर्वात कमी प्रमाण आहे. कोरोनाच्या ९२ टक्के प्रकरणांत आजाराचे स्वरूप सौम्यच असल्याचे आढळून आले आहे. दुसरीकडे, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना व्हायरसचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या पाचच राज्यांत आहेत. देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर ७८ टक्क्यांपर्यंत पाेहोचला आहे.

जगभरात एकाच दिवसात आजवरचे विक्रमी बाधित
जिनेव्हा | जगभरात एकाच दिवसात नवे रुग्ण आढळण्याचा विक्रम झाला आहे. जागतिक आराेग्य संघटनेनुसार, गेल्या २४ तासांत जगात ३ लाख ७,९३० रुग्ण आढळले. ते गेल्या आठवड्यात नोंदवलेल्या रुग्णांपेक्षा १ हजाराने जास्त आहे. सोमवारी सकाळपर्यंत जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ कोटी ८८ लाख ९१,६७६ होती. मृतांचा आकडा ९ लाख २२,४४१ वर गेला होता. अमेरिकेत आजही सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू झाले आहेत. येथे आतापर्यंत ६५ लाख १९,१२१ रुग्ण व १ लाख ९४,०४१ मृत्यू झाले आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser