आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Price Of COVID19 Vaccine In Gujarat Will Be Rs 250 In Private Hospitals NITI Aayog Propose Vaccine Price Between Rs 300 To 500

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा:खासगी केंद्रांवर 250 रुपयांमध्ये मिळणार व्हॅक्सीन, सरकारी हॉस्पीटलमध्ये कोणताच चार्ज द्यावा लागणार नाही

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा येत्या 1 मार्चपासून सुरू होत आहे. या टप्प्यात खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे, पण यात लोकांना लसीसाठी पैसे मोजावे लागतील. वृत्त संस्थांनी सूत्र्यांच्या हवाल्याने सांगितले की, खासगी रुग्णालयात लस घेण्यासाठी 250 रुपये द्यावे लागतील. यात रुग्णालयांच्या सर्व्हिस चार्जचा समावेश आहे. तिकडे, गुजरातमध्ये राज्य सरकारने खासगी रुग्णालयात 250 रुपयांना लस मिळणार असव्याची घोषणा केली आहे.

सरकारी रुग्णालयात मोफत मिळणार लस
1 मार्चपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या टप्प्यात 12 हजार सरकारी रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस दिली जाईल. यात 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आजारी व्यक्तींना आणि 60 वर्षांपुढील सर्वांना लस दिली जाईल. केंद्र सरकारच्या अंदाजानुसार, या कॅटेगरीमधअये 27 कोटी लोक आहेत.

गंभीर आजारी असल्याचे सर्टिफीकेट द्यावे लागेल
ज्या लोकांचे वय 60 पेक्षा जास्त आहे, त्यांना रजिस्ट्रेशन आणि लसीकरणादरम्यान ID कार्ड सोबत ठेवावे लागेल. 45 ते 60 मधील लोकांना आजारी असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट द्यावे लागेल. आजाराच्या लिस्टमध्ये कोणते आजार असतील, याबाबत सरकार लवकरच लिस्ट जारी करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...