आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Priest Burnt In Land Dispute In Rajasthan, Opposition Attacks Gehlot Government Over Law And Order

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भरतपूर:राजस्थानमध्ये जमिनीच्या वादातून पुजाऱ्याला जाळले, कायदा-सुव्यवस्थेवरून गहलोत सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल

भरतपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

करौली येथे दोन दिवसांपूर्वी जमिनीच्या वादातून एका मंदिराच्या पुजाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या पुजाऱ्याला जयपूरच्या सवाई मानसिंह रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुख्य आरोपी कैलाश मीना याला अटक केली आहे.

ही घटना करौलीच्या सपोटरा ठाणे क्षेत्रातील बुकनात घडली. येथे मंदिरात बाबूलाल वैष्णव (५०) पूजा करून देखभाल करत होता. मंदिराची जमीनही त्याच्या ताब्यात होती. या जमिनीच्या हव्यासातून कैलाश मीना याने पुजाऱ्यावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. दरम्यान, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, आरोपीस अटक झाली आहे, असे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले.

कायदा-सुव्यवस्थेवरून गहलोत सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल
या भयंकर घटनेनंतर राजस्थानपासून दिल्लीपर्यंत राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी राजस्थान सरकार आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर टीका केली. भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले, ‘राज्यात गुन्हे वाढले, गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नाही. मुख्यमंत्री अखेर किती जणांना पाठीशी घालणार?’ माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनीही राज्यात महिला, मुले, वृद्ध आणि दलित असे कुणीच सुरक्षित नाहीत, अशा शब्दांत टीका केली. तर आता राहुल गांधी यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागावा, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser