आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Albanese Said, The Security Of Indians In Australia Will Be Given Priority

पंतप्रधान अल्बनीज म्‍हणाले:ऑस्ट्रेलियातील भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार,मोदी यांनी मांडला होता भारतीयांच्या सुरक्षेचा मुद्दा

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासमोर त्यांच्या देशातील मंदिरांवर होत असलेल्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आश्वासन अल्बनीज यांनी दिले. ते ८ ते ११ मार्चपर्यंत भारताच्या दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘गेल्या काही आठवड्यांपासून ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर हल्ले होत असल्याचे वृत्त येत आहे. यामुळे भारतातील लोकांची चिंता वाढली आहे. यासंदर्भात आमची पथके नियमितपणे संपर्कात राहतील. अशा आव्हानांचा सामना करणे महत्त्वाचे आहे.’ मोदी म्हणाले, सप्टेंबरमध्ये जी-२० परिषदेत मला पुन्हा ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचे भारतात स्वागत करण्याची संधी मिळेल.

जानेवारीत आॅस्ट्रेलियात ३ मंदिरांवर झाले होते हल्ले
जानेवारीत मेलबर्नच्या अल्बर्ट पार्क भागात इस्कॉनच्या हरेकृष्ण मंदिराची तोडफोड झाली. याच महिन्यात कॅरम डाउन्समध्ये श्री शिव विष्णू मंदिर व स्वामीनारायण मंदिरात तोडफोड झाली होती. भारतीय उच्चायुक्तालयाने या घटना भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदायात द्वेष आणि विभाजन निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...