आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Modi And Sher Bahadur Deuba Inaugurated The Railway Line. In The First Phase, Jayanagar To Kurtha Train Will Run

भारत-नेपाळ रेल्वे सेवेला मिळणार हिरवा सिग्नल:पंतप्रधान मोदी आणि शेर बहादूर देउबा यांच्या हस्ते रेल्वे मार्गाचे उद्घाटन, पहिल्या टप्प्यात जयनगर ते कुर्था रेल्वे धावणार

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि नेपाळ या नवीन रेल्वे सेवा सुरू होत असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 2 एप्रिल शनिवारी पंतप्रधान मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा हे नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचे उद्घाटन करतील. दोन्ही देशांमधील रेल्वे मार्ग जयनगर-बिजलपुरा-बर्दीदासला जोडला जाणार आहे. असे मोदी आणि शेर बहादुर देउबा यांनी सांगितले. तसेच पहिल्या टप्प्यात, 34.5 किमी रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले जाईल, जे बिहारमधील जयनगरला नेपाळमधील जनकपूरमधील कुर्था स्टेशनशी जोडले जाईल

फक्त भारतीय आणि नेपाळी प्रवासांना परवानगी
डीआरएम आलोक अग्रवाल यांनी सांगितले की, शनिवारी (02 एप्रिल) उद्घाटनानंतर रेल्वे कर्मचारी आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ट्रेन कुर्थाकडे रवाना होईल. रविवारपासून प्रवाशांसाठी रेल्वे सेवा सुरू होणार आहे.विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये फक्त भारतीय आणि नेपाळी लोक प्रवास करू शकतात. रेल्वे बोर्डाने यासाठी एक एसओपी जारी केला आहे, ज्यामध्ये इतर देशांतील नागरिकांना ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी नाही.

ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे

  • प्रवासादरम्यान लागणारी ही आहेत खालील ओळखपत्र
  • वैध पासपोर्ट
  • भारत सरकार / राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेशाद्वारे जारी केलेले फोटो व ओळखपत्र.
  • भारत निवडणूक आयोगाने जारी केलेले मतदार ओळखपत्र.
  • नेपाळमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने जारी केलेले आपत्कालीन प्रमाणपत्र/ओळख प्रमाणपत्र.
  • 65 वर्षांवरील आणि 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांकडे फोटो ओळखपत्र जसे की पॅन कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / CGHS कार्ड / रेशन कार्ड असणे अनिवार्य. भारत आणि नेपाळदरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू झाल्यावर दोन्ही देशांमधील प्रवास होणार अधिक सोप्पा. नेपाळला आता कमी वेळेत पोहचू शकणार

8 वर्षांनंतर रेल्वे सेवा सुरू
रेल्वे सेवा ही भारत आणि नेपाळमधील जीवनवाहिनी मानली जाते. 2010 मध्ये भारत सरकारने छोट्या लाईनचे मोठ्या लाईनमध्ये रूपांतर करण्यासाठी 550 कोटी रुपये मंजूर केले होते. 2012 पासून यावर काम सुरू झाले. 2014 पर्यंत दोन्ही देशांदरम्यान नेपाळी नॅरोगेजवर 3 गाड्या धावत होत्या, परंतु गाड्यांच्या दुर प्रवासामुळे कोळशाचा वापरही खूप वाढला होता. त्यामुळे रेल्वेचे कामकाज ठप्प झाले.

जुलै 2021 मध्ये, या विभागात लोकोमोटिव्ह इंजिनची वेगवान चाचणी यशस्वीपणे पार पडली. आता पुन्हा 8 वर्षांनंतर रेल्वे सेवा सुरू झाल्याने दोन्ही देशातील्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

बातम्या आणखी आहेत...