आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Modi Consoled The Families Of The Victims Of The Bridge Disaster, Inquired About The Condition Of The Injured Admitted To The Hospital

पूल दुर्घटनेतील पीडित कुटुंबांचे पंतप्रधान मोदींनी केले सांत्वन:रुग्णालयात दाखल जखमींच्या प्रकृतीची केली चौकशी

मोरबी (गुजरात)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या मोरबीत मच्छू नदीवरील झुलता पूल दुर्घटनेनंतर दोन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मोरबीला पोहोचले. त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी एसपी कार्यालयात प्रियजनांना गमावलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी घटनास्थळी पोहोचून तुटलेल्या पुलाची पाहणी केली. बराच वेळ थांबून अपघाताची संपूर्ण माहिती घेतली.

एसपी कार्यालयात पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या वेळी ते म्हणाले, मोरबी दुर्घटनेशी संबंधित सर्व बाबींचा तपास करण्यासाठी सविस्तर, व्यापक व सखोल तपास आवश्यक आहे. पीडितांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

अन्य राज्यांतही असे पूल : याचिकेवर १४ रोजी सुनावणी नवी दिल्ली |मोरबी अपघात प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. एका याचिकाकर्त्याने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर १४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगितले. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे याचिकाकर्ते वकील विशाल तिवारी यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. योग्य दुरुस्ती केली असती आणि देखभाल नियमांचे पालन केले असते तर दुर्घटना टाळता आली असती. त्यामुळे त्यावर तातडीने सुनावणी झाली पाहिजे. सरन्यायाधीशांनी विचारले की लवकर सुनावणीची गरज का आहे? यावर विशाल म्हणाले की, इतर राज्यांतही अशाच प्रकारची रचना असणारे पूल आहेत. अशा घटना रोखण्यासाठी विविध राज्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या अशा पुलांचे मूल्यमापन करण्याची गरज आहे. यानंतर सरन्यायाधीशांनी १४ नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी करण्याचे निर्देश दिले.

बातम्या आणखी आहेत...