आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Modi Held A Meeting With The Chief Ministers Of 4 States Including UP Rajasthan; Home Minister Shah Reviewed The Preparations For 'Taukte'

कोरोना आणि चक्रीवादळाबाबतीत ॲक्शनमध्ये सरकार:पंतप्रधान मोदींनी यूपी-राजस्थानसह 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत घेतली बैठक; गृहमंत्री शाह यांनी 'तौक्ते'च्या तयारीचा घेतला आढावा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्णालयात वीज बॅकॲप वाढवण्यावर गृहमंत्र्यांचा भर

देशात कोरोना महामारीच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली. यामध्ये मोदी यांनी संबंधित राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, बैठकीमध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि पुडुचेरीच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होता. खरं तर, या चार राज्यांपैकी तीन राज्यांतील कोरोनाचे सक्रिय प्रकरणे देशातील एकूण प्रकरणाच्या 74.69% आहे. यातील सर्वात जास्त सक्रिय रुग्ण राजस्थान (2,08,698), उत्तर प्रदेश (1,77,643) आणि छत्तीसगढ़ (1,10,401) मध्ये आहे.

या बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी कोरोना परिस्थितीसोबत लसीकरणावरदेखील चर्चा केली. यापूर्वी मोदी यांनी शनिवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी गावो-गावी जाऊन कोरोनाची चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. यासोबतच या मोहिमेमध्ये आशा कामगारांना सामील करण्यास सांगितले होते.

रुग्णालयात वीज बॅकॲप वाढवण्यावर गृहमंत्र्यांचा भर
गृहमंत्री अमित शहा यांनी 'तौक्ते' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या व्हर्च्युअल बैठकीमध्ये महाराष्ट्र, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसमवेत राज्यातील इतर अधिकार्‍यांचा समावेश होता. या बैठकीमध्ये शहा यांनी मदत आणि बचावकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. सोबतच रुग्णालयातील वीज बॅक ॲप वाढण्यावरदेखील भर दिला आहे. याशिवाय चक्रीवादळासंदर्भात गृह मंत्रालयात एक नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला असून ते सतत परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहे.

NDRF च्या 53 टीम अलर्टवर
NDRF चे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी शुक्रवारी सांगितले - केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र या किनारपट्टी भागात एनडीआरएफची 53 पथके तैनात आहेत.

वायुसेना अलर्ट; मच्छिमारांना दिला इशारा

  • वादळाची शक्यता पाहता भारतीय हवाई दलही अलर्ट मोडमध्ये आहे. हवाई दलाने 16 परिवहन विमान आणि 18 हेलिकॉप्टरला मदत व बचाव कार्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे.
  • गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्रच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळासाठी तटरक्षक दल सतर्क आहे. तसेच मच्छिमारांना समुद्रापासून दूरच राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...