आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Modi Hoisted The Tricolor On The Red Fort For The Seventh Time, Beating Atalji; Nehruji Had Hoisted The Flag A Maximum Of 17 Times

स्वातंत्र्यदिनी नवीन विक्रम:पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर सातव्यांदा तिरंगा फडकावला, अटलजींना मागे टाकले; नेहरूजींनी सर्वाधिक 17 वेळा ध्वजारोहण केले होते

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 14-15 ऑगस्टच्या रात्री भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु 16 ऑगस्ट रोजी झाले पहिले ध्वजारोहण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी 74 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर सातव्यांदा ध्वजारोहण केले. यासोबत मोदींनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मागे टाकले आहे. अटलजी हे पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान होते ज्यांनी लाल किल्ल्यावर 6 वेळा तिरंगा फडकावला. लाल किल्ल्यावर अधिक वेळा ध्वजारोहण करणाऱ्या पंतप्रधानांच्या यादीत मोदी चौथ्या क्रमांकावर आले आहेत.

माजी दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी सर्वाधिक 17 वेळा लाला किल्ल्यावर तिरंगा फडकावला होता. दुसऱ्या क्रमांकावर इंदिरा गांधी आहेत. त्यांनी 16 वेळेस ही संधी मिळाली. त्यानंतर मनमोहन सिंह (10 वेळा) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर राजीव गांधींनी 5 वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला होता.

पहिल्या स्वातंत्र्यदिनी 16 ऑगस्ट रोजी फडकवण्यात आला तिरंगा

14-15 ऑगस्टच्या रात्री भारताला स्वातंत्र्य मिळाले होते, मात्र पहिल्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला नाही तर 16 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला होता. यानंतर दरवर्षी लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाच्या परंपरेला सुरूवात झाली.

गुलझिलालाल नंदा आणि चंद्रशेखर असे पंतप्रधान, ज्यांना ही संधी मिळाली नाही

गुलजारीलाल नंदा दोन वेळेस 13-13 दिवसांसाठी पंतप्रधान झाले होते. पहिल्यांदा 27 मे ते 9 जून 1964 पर्यंत आणि दुसऱ्यांदा 11 जानेवारी ते 24 जानेवारी 1966 कार्यवाहक पंतप्रधान राहिले. तर चंद्रशेखर 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991 पर्यंत जवळपास 8 महिने पंतप्रधान राहिले. मात्र या दोघांनाही लाल किल्ल्यावर झेंडा फडकविण्याची संधी मिळाली नाही.

बातम्या आणखी आहेत...