आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Modi Home Minister Amit Shah Meeting; Discussion Of Narayan Rane's Name; News And Live Updates

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार:पंतप्रधान मोदी-गृहमंत्री अमित शहांची बैठक; नारायण राणेंच्या नावाची चर्चा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नव्या मंत्र्यांचा शपथविधी बुधवार, 7 जुलै रोजी होऊ शकतो.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अाणि गृहमंत्री अमित शहा यांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत भाजपचे संघटन महामंत्री बी.एल.संतोषही उपस्थित होते. मंत्रिमंडळातील विस्तारासंदर्भात ही बैठक होती, असे सांगितले जाते. विद्यमान केंद्रीय मंत्रिमंडळात ५३ मंत्री अाहेत. नियमानुसार मंत्र्यांची संख्या ८१ पर्यंत वाढवता येऊ शकते.

दरम्यान, या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून ज्येष्ठ भाजप नेते नारायण राणे यांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा अाहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी बुधवार, ७ जुलै रोजी होऊ शकतो. अर्थात याबाबत अद्याप अधिकृतरीत्या माहिती देण्यात अालेली नाही. परंतु विस्तार झाल्यास पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात मोदींच्या मंत्रिमंडळातील हा पहिलाच विस्तार आहे.

या बदलामध्ये आसाममधून सर्बानंद सोनोवाल, मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य शिंदे आणि बिहारमधून माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. पुढील वर्षी विधानसभा निवडणूक असल्याने उत्तर प्रदेशला झुकते माप मिळण्याची शक्यता असून वरुण गांधी, रामशंकर कठेरिया, अनुप्रिया पटेल यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे सांगितले जाते.

बातम्या आणखी आहेत...