आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा केदारनाथ दौरा:पंतप्रधान म्हणाले - विध्वंस स्वत:च्या डोळ्यांनी पाहिला; पण आतला आवाज सांगत होता की, हे पूर्वीपेक्षा अधिक अभिमानाने उभे राहील

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ धाममध्ये पोहोचले आहेत. त्यांनी येथे गर्भगृहात सुमारे 15 मिनिटे पूजा करून त्यानंतर मंदिराची प्रदक्षिणा केली. यानंतर आदिगुरू शंकराचार्यांच्या नुकत्याच बांधलेल्या समाधीस्थळावर शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.

केदारनाथ धाममध्ये पंतप्रधानांनी पायाभरणी आणि अनेक प्रकल्पांचे उद्घाटनही केले. यावेळी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत आणि विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे देखील उपस्थित होते. यानंतर पीएम मोदींनी 'जय बाबा केदार'च्या उद्घोषाणे भाषणाला सुरुवात केली.

मी स्वतःच्या डोळ्यांनी विध्वंस पाहिला
मोदी म्हणाले, "आज येथे अनेक योजनांची पायाभरणी झाली आहे. इथल्या प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी रुग्णालय असेल ते त्यांच्या यात्रेला त्रासमुक्त करून केदारनाथ युक्त होईल." काही वर्षांपूर्वी जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा मला स्वतःला सावरता आले नाही. मी इकडे धावत आलो. मी माझ्या डोळ्यांनी विध्वंस पाहिला. त्या वेदना सहन केल्या होत्या. इथे येणार्‍या लोकांना वाटायचे की, हे आमचे केदारधाम पुन्हा उभे राहील की नाही, पण माझा आतला आवाज सांगत होता की हे पूर्वीपेक्षा जास्त अभिमानाने उभे राहील.'

भारताच्या आध्यात्मिक समृद्धीचे आणि वारशाचे अलौकिक दृश्य
पीएम मोदी म्हणाले, 'आज सर्व मठ, सर्व 12 ज्योतिर्लिंगे, अनेक शिवालये, शक्तिधाम, पूज्य गुरु, ऋषी-संत आणि अनेक भक्तही या केदारनाथच्या पवित्र भूमीसोबत देशाच्या कानाकोपऱ्यात सशरीर नाहीत, परंतु आत्मिक रूपाने व्हर्चुअल रूपात आपल्याला आशीर्वाद देत आहेत.आदि शंकराचार्यांच्या समाधीची पुनर्स्थापना तुम्ही सर्वजण पाहत आहात. भारताच्या अध्यात्मिक समृद्धी आणि वारशाचे हे एक अथांग दृश्य आहे.'

चुकून कोणाचे नाव घ्यायचे राहिले तर मला पाप लागेल
मोदी म्हणाले, 'आपला देश खूप विशाल आहे. एवढी मोठी ऋषी परंपरा आहे, एकामागून एक महात्मे आध्यात्मिक चैतन्य जागृत करत राहतात. या कार्यक्रमात ते आजही आमच्याशी जोडले गेले आहेत. त्यांचीही नावे सांगायची असतील तर आठवडा निघून जाईल. मी चुकून त्यांच्यापैकी कोणाचे नाव घ्यायचे विसरलो तर मी पापी ठरेन. म्हणूनच मी त्यांची नावे घेत नाही.

पंतप्रधान म्हणाले, 'आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनम्। पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर। अशा वेळी अशा तमाम लोकांची माफी मागताना मी सर्व महान संत परंपरेच्या अनुयायांना हात जोडून नमन करतो. आपल्या संतपरंपरेत नेती, अशी एक अनुभूती, विश्व नेती, नेती म्हणत जगाचा विस्तार केला आहे.

रामचरित मानस पाहिले तर त्यातही या मुद्द्याची पुनरावृत्ती झाली आहे. त्यात लिहिले आहे की, अविगत अकथ अपार, नेती नेती नित निगम कह। म्हणजेच काही अनुभव इतके अलौकिक, इतके अनंत असतात की ते शब्दात व्यक्त करता येत नाहीत.'

पीएम म्हणाले, 'जेव्हा मी बाबा केदारनाथच्या आश्रयाला येतो, तेव्हा मी इथल्या प्रत्येक कणाशी जोडून जातो. बाबा केदारनाथची उपस्थिती मला कोणत्या अनुभूतीकडे खेचते, त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. काल मी माझ्या सैनिकांसोबत सीमेवर दिवाळी साजरी करत होतो. सणांचा आनंद मी माझ्या देशाच्या सैनिकांसोबत शेअर केला आहे. देशवासीयांचा त्यांच्याप्रती असलेला आदर, त्यांचे आशीर्वाद घेऊन सैनिकांमध्ये गेलो होतो.

बाबा केदारनाथला अर्पण केले व्याघ्रांबर वस्त्र
केदारनाथ धामवर पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी व्याघ्रांबर वस्त्र अर्पण केले. येथे त्यांनी षोडशोपचार पूजा केली. बाबा केदार यांची दूध, दही, मध आदींनी पूजा करण्यात आली.

शंकराचार्यांच्या समाधी स्थळाचे उद्घाटन
पीएम मोदींनी शंकराचार्यांच्या समाधीस्थळाचे लोकार्पण केले. 2013 मध्ये केदारनाथमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीत त्याचे नुकसान झाले होते. पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेली शंकराचार्यांची मूर्ती १२ फूट उंच आणि ३५ टन वजनाची आहे.

साधू-संतांनाही आमंत्रित केले आहे
पंतप्रधानांच्या कार्यक्रमात देशभरातील साधू-संतांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये परमार्थ निकेतनचे स्वामी चिदानंद सरस्वती, निरंजनी आखाड्याचे स्वामी कैलाशानंद सरस्वती आणि चारधाम बोर्डाचे सदस्य पंडित श्रीनिवास पोस्ती यांचा समावेश आहे.

भाजपला पंतप्रधानांचा दौरा संस्मरणीय बनवायचा आहे
हा ऐतिहासिक सोहळा संस्मरणीय करण्यासाठी भाजपने देशव्यापी कार्यक्रम आखला आहे. याअंतर्गत चारधाम, बारा ज्योतिर्लिंगे आणि प्रमुख मंदिरे, एकूण ८७ तीर्थक्षेत्रांवरील पंतप्रधानांचे भाषण एलईडी आणि मोठ्या स्क्रीनवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहे. ही सर्व मंदिरे श्री आदि शंकराचार्यांच्या यात्रा मार्गावर देशभर स्थापित आहेत.

बातम्या आणखी आहेत...