आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:टाइमच्या वर्ष 2021 मधील प्रभावी लोकांच्या यादीत पंतप्रधान मोदी, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममतांचे नाव

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिष्ठित टाइम मॅगझिनने २०२१ मधील सर्वात प्रभावी १०० लोकांची यादी जाहीर केली आहे. ही यादी ६ गटांत आयकॉन्स, पायोनिअर्स, टायटन्स, आर्टिस्ट, लीडर्स व इनोव्हेटर्स श्रेणींमध्ये विभागली आहे. वेगवेगळ्या श्रेणींमध्ये भारतातील ५ जण आहेत. सर्वात प्रभावशाली नेत्यांत अमेरिकेच्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे नाव आहे. तसेच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीही आहेत. राजकीय नेत्यांत चकित करणारे नाव म्हणजे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. पायोनिअर्समध्ये सीरमचे प्रमुख अदर पूनावाला तर आयकॉन्समध्ये भारत वंशाच्या अमेरिकी अॅक्टिव्हिस्ट मंजूषा पी. कुलकर्णी यांचा समावेश आहे.

यादीत ५४ महिला
या वर्षीच्या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे १०० प्रभावी व्यक्तींमध्ये ५४ महिला आहेत. यात प्रिन्स हॅरीची पत्नी मेगन मर्केल आणि अभिनेत्री स्कार्लेट जोहान्सनचा समावेश आहे.

बायडेन यांच्यासोबत मुल्ला बरादरचेही नाव
प्रभावी नेत्यांमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे नाव समाविष्ट आहे. तर, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे उपपंतप्रधान अब्दुल गनी मुल्ला बरादरचाही यात समावेश आहे. या श्रेणीत रशियाच्या विरोधी पक्षनेत्या अॅलेक्सई नव्हेल्नी यांचा समावेश आहे.

- नरेंद्र मोदी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टाइमने पंडित नेहरू व इंदिरा गांधींनंतर तिसरे सर्वात प्रभावी व्यक्ती संबोधले आहे.
- कमला हॅरिस - अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना सर्वात शक्तिशाली महिला राजकीय नेत्या म्हणून दिले महत्त्वाचे स्थान.
- मंजूषा - अमेरिकेतील वांशिक हिंसाचाराविरुद्ध आंदोलनाच्या मंजूषा पी. कुलकर्णी यांना आदर्श मानले.
- अदर पूनावाला - सीरमचे प्रमुख अदर पूनावाला आता जगभरातील लसीकरण मोहिमेत मोठा आदर्श ठरू पाहत आहेत.
- ममता बॅनर्जी - प. बंगालच्या मुख्यमंत्र्यांबाबत टाइम म्हणते, राजकारणातील झुंजार नेतृत्व म्हणून ममता बॅनर्जींचा उदय.

बातम्या आणखी आहेत...