आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी “परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी मुलांना दडपण न घेण्याचा सल्ला दिला. पंतप्रधानांनी आई-वडील आणि शिक्षकांना सांगितले की, आपली अर्धवट स्वप्ने आणि आकांक्षा मुलांवर लादू नका. त्यांना भविष्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या.
तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित परीक्षा पे चर्चाच्या ५ व्या भागात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितले की, तंत्रज्ञानाचा प्रभावी पद्धतीने वापर केला पाहिजे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन शिक्षण नव्हे, तर मन भरकटणे ही समस्या आहे. ऑनलाइन शिक्षणाचे ज्ञान ऑफलाइन लागू करावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.