आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जसजशा पाच राज्यांच्या निवडणुका जवळ येत आहेत, त्या राज्यांमध्ये नेत्यांचे राजकीय दौरेही वाढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी आसाम आणि बंगालच्या दौऱ्यावर होते. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केरळला आले. मोदींनी दोन्ही राज्यांत विविध प्रकल्पांचे उद्घाटन करत सभांनाही मार्गदर्शन केले. एक महिन्याच्या आत मोदींचा हा तिसरा बंगाल दौरा आहे.
हुगळीत सभेत मार्गदर्शन करताना मोदींनी सांगितले, आता पश्चिम बंगालने परिवर्तनाचे मन तयार केले आहे. मा, माटी, मानुषबद्दल बोलणारे बंगालच्या विकासाच्या आड उभे ठाकले आहेत. आम्ही बंगालला ‘टोलमुक्त’ आणि ‘रोजगारयुक्त’ करणार. तर केरळच्या वायनाडमध्ये राहुल गांधी कृषी कायद्यांविरोधात आयोजित ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झाले. राहुल म्हणाले, कृषी एकमेव व्यवसाय आहे जो भारतमातेशी संबंधित आहे, त्यावर ताबा मिळवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचे दु:ख केंद्र सरकार समजून घेत नाहीये. त्यांना बाध्य केले जात नाही तोपर्यंत ते हे तिन्ही कायदे मागे घेणार नाहीत.
एक महिन्याच्या आत पीएम मोदींचा हा तिसरा बंगाल दौरा
अभिषेक बॅनर्जींच्या मेहुणीची चौकशी
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांची मेहुणी मेनका गंभीर यांच्या घरी सोमवारी दुपारी सीबीआयने तीन तासांपेक्षा जास्त काळ त्यांची चौकशी केली. तर अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुचिरा यांनी सीबीआयला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, तुम्ही तुमच्या सोयीनुसार २३ फेब्रुवारीला सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कधीही घरी येऊ शकता. सीबीआयने रविवारी बॅनर्जी यांची चौकशी केली.
मोदींचा २ मार्चपर्यंत पाच राज्यांत दौरा
पंतप्रधान मोदी यांचा पाच राज्यांचा शासकीय दौरा निश्चित आहे. या दौऱ्यात ते अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करतील. पंतप्रधान २७ फेब्रुवारीला केरळ, २८ फेब्रुवारीला पश्चिम बंगाल, १ मार्चला तामिळनाडू आणि २ मार्चला आसामचा दौरा करतील. तर ७ मार्चला ते कोलकात्यातील ब्रिगेड मैदानात भाजपच्या सभेत मार्गदर्शन करतील. त्याच दिवशी बंगालमध्ये पक्षाच्या पाच परिवर्तन यात्रांचा समारोप होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.