आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Modi To Perform Bhoomi Pujan Of New Parliament Building, Likely To Be Ready In Two Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

99 वर्षांनंतर बनणार नवीन संसद:मोदींनी केले नव्या संसद भवनाचे भूमिपूजन, म्हणाले - यामध्ये नूतन आणि पुरातन सामंजस्य आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवीन संसद भवनाच्या सेंट्रल विस्टा प्रोजेक्टच्या पध्दतीवर सुप्रीम कोर्टाने 7 डिसेंबरला नाराजी व्यक्त केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी संसद भवनाच्या नव्या बिल्डिंगचे भूमिपूजन केले. नवीन भवनामध्ये लोकसभा खासदारांसाठी 888 आणि राज्यसभा खासदारांसाठी 326 पेक्षा जास्त सीट असतील. पार्लमेंट हॉलमध्ये एकूण 1,224 सदस्य एकाच वेळी बसू शकतील. सध्याचे संसद भवन 1921 मध्ये बनण्यास सुरुवात झाली होती. 6 वर्षांनंतर म्हणजेच 1927 मध्ये बनून तयार झाले होते.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
आजचा दिवस ऐतिहासिक

आजचा 130 कोटी भारतीयांसाठी हा मोठा भाग्य आणि अभिमानाचा दिवस आहे, आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत. आजचा दिवस हा भारताच्या लोकशाही इतिहासातील मैलाचा दगड आहे. भारतीय लोकसभेच्या भारतीय कल्पनेने चिन्हांकित केलेल्या भारतीय संसदेच्या इमारतीचे उद्घाटन लोकशाही परंपरेतील महत्त्वपूर्ण टप्प्यांपैकी एक आहे. आपण भारतीय जनता एकत्रितपणे आपल्या संसदेची नवीन इमारत बनवू. यापेक्षाही पवित्र काय असेल, जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा उत्सव साजरा करेल, तेव्हा आपल्या संसदेची नवीन इमारत त्या उत्सवासाठी प्रेरणादायक असेल. मित्रांनो, नवीन संसदेच्या इमारतीचे बांधकाम हे नवीन आणि प्राचीन सहजीवतीचे उदाहरण आहे

लोकशाहीच्या मंदिरास अभिवादन
वेळ आणि गरजांनुसार स्वतःला बदलण्याचा हा प्रयत्न आहे. 2014 मध्ये खासदार म्हणून पहिल्यांदा मला संसदेत येण्याची संधी मिळाली तेव्हाचा हा क्षण मी कधीही विसरू शकत नाही. लोकशाहीच्या या मंदिरात पाऊल ठेवण्यापूर्वी मान झुकवून या मंदिराला नमन केले होते.

जुनी संसद ऐतिहासिक

स्वातंत्र्य चळवळीनंतर स्वतंत्र भारत निर्माण करण्यात आमच्या सध्याच्या संसद भवनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. स्वतंत्र भारताचे पहिले सरकारही येथे स्थापन झाले आणि पहिली संसदही इथे बसली. या इमारतीत, संविधान तयार केले गेले, लोकशाही पुनर्संचयित झाली. संसदेची सध्याची इमारत स्वतंत्र चढउतार, आव्हाने, आशा आणि स्वतंत्र भारताच्या अपेक्षा यांचे प्रतीक आहे. या इमारतीत बनलेला प्रत्येक कायदा, संसदेत म्हटलेल्या सखोल गोष्टी आपल्या लोकशाहीचा वारसा आहेत.

भूमिपूजनमध्ये प्रत्येक धर्माच्या पुजारींनीही पूजा केली. कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कायदामंत्री रविशंकर प्रसाद, लोकसभा स्पीकर ओम बिर्लांसह अनेक मंत्री उपस्थित होते.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधानांना आमंत्रित केले होते. त्यांनी हे देखील म्हटले होते की, 2022 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याचे 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आम्ही नवीन संसद भवनात दोन्ही सभागृहांचे अधिवेशन सुरू करू.

नवीन भवनामध्ये लोकसभा खासदारांसाठी जवळपास 888 आणि राज्यसभा खासदारांसाठी 326 पेक्षा जास्त सीट असतील. पार्लियामेंट हॉलमध्ये एकूण 1,224 सदस्य एकत्र बसतील.

सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली नाराजी
नवीन संसद भवनाच्या सेंट्रल विस्टा प्रोजेक्टच्या पध्दतीवर सुप्रीम कोर्टाने 7 डिसेंबरला नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की प्रलंबित अर्जावरील अंतिम निर्णय होईपर्यंत केंद्रीय व्हिस्टा प्रकल्पांतर्गत कोणतेही बांधकाम, तोडफोड किंवा झाडे तोडण्याचे काम करू नये.

टाटाला मिळाली जबाबदारी
अधिकाऱ्यांनी सप्टेंबरमध्ये सांगितले होते की नवीन इमारत त्रिकोणाच्या आकारात तयार केली गेली. हे सध्याच्या परिसराच्या जवळ बांधले जाईल. यासाठी 861.90 कोटी रुपये लागतील. ते तयार करण्याची जबाबदारी टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडकडे आहे.

देशातील सर्वात मोठी इंजीनियरिंग कंपनी लार्सन अँड टुब्रो (L&T)यासाठी 865 कोटीं रुपयांची बोली लावली होती. तर सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट (CPWD) कडून 940 कोटी रुपयांचा खर्च सांगण्यात आला होता. अखेर हा प्रोजेक्ट टाटाच्या हाती गेला.

पार्लियामेंट लुटियन्सने डिझाइन केली होती
सध्या तयार असलेले संसद भवन हे इंग्रजांच्या काळात बनले होते. याला एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी डिझाइन केले होते.. त्यांनी नवी दिल्लीचे कंस्ट्रक्शन आणि प्लानिंगही केली होती. गोल आकारात बनलेले हे संसद भवून भारतातील सर्वात उत्कृष्ट इमारतींमधील एक आहे. यासमोर महात्मा गांधींची प्रतिमा बनवण्यात आली आहे.

हा सेंट्रल विस्टाचा मास्टर प्लान
सरकारने राष्ट्रपती भवनापासून ते इंडिया गेटच्या मधे अनेक इमारती बनवण्यासाठी सेंट्रल विस्टाचा मास्टर प्लान तयार केला आहे. याच परिसरात सेंट्रल सेक्रेटेरिएटसाठी 10 बिल्डिंग बनवल्या जातील. राष्ट्रपती भवन, सध्याचे संसद भवन, इंडिया गेट आणि राष्ट्रीय अभिलेखागारच्या इमारतीला तसेच ठेवले जाईल.

सेंट्रल विस्टाच्या मास्टर प्लाननुसार, जुन्या संसद भवनासमोर गांधींजींच्या प्रतिमेमागे नवीन त्रिकोण संसद भवन बनेल. यामध्ये लोकसभा आणि राज्यसभासाठी एक-एक इमारत असेल, मात्र सेंट्रल हॉल बनणार नाही. ही इमारत 13 एकर जमीनीवर तयार होईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser