आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Modi Will Address In A While, On This Day Mahatma Buddha Gave The First Sermon To His First 5 Disciples.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धम्म चक्र प्रवर्तन दिन:जग आज असाधारण आव्हानांचा सामना करत आहे, बुद्धांच्या शिक्षेने याचा सामना करण्याचा मार्ग मिळू शकतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजच्या दिवशी महात्मा बुद्धांनी आपल्या पहिल्या पाच शिष्यांना प्रथम उपदेश केला, याला धम्म चक्र प्रवर्तन दिवस म्हणून साजरे केले जाते

आषाढ पोर्णिमा (गुरु पोर्णिमा)च्या निमित्ताने शनिवारी धम्म चक्र प्रवर्तन दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून संबोधित केले. ते म्हणाले की, 'जग आज असाधारण आव्हानांचा सामना करत आहे, बुद्धांच्या शिक्षेने या आव्हानांचा सामना करण्याचा मार्ग मिळू शकतो.' आजच्याच दिवशी महात्मा बुद्धांनी आपल्या पहिल्या पाच शिष्यांना प्रथम उपदेश दिला होता.

मोदी म्हणाले , 'आज आषाढ पोर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा. याला गुरु पोर्णिमा या नावानेही ओळखले जाते. ज्यांनी आपल्याला ज्ञान दिले. त्या गुरुंचे स्मरण करण्याचा आज दिवस आहे. त्याच भावननेने आपण भगवान बुद्धांना श्रद्धांजली देतो. भगवान बुद्धांचा अष्ठांग मार्ग हा जगातील अनेक समाज आणि देशांना कल्याणचा मार्ग दाखवतो. ते करुणा आणि दयेचे महत्त्व समजावते. विचार आणि कामात दोन्हींमध्ये भगवान बुद्धांच्या शिकवणीचा उपयोग होतो.' यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात धम्म चक्र दिवस कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

बुद्धांचे आदर्श आजही फायदेशीर 

पंतप्रधान म्हणाले की, आज जग असाधारण आव्हानांचा सामना करत आहे. या आव्हानांसाठी स्थायी समाधान भगवान बुद्धांचा आदर्शांमधून मिळू शकते. ते भूतकाळात प्रासंगिक होते, ते वर्तमानात प्रासंगिक होते आणि ते भविष्यातही प्रासंगित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...