आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. कोरोना व्हायरसवर त्यांचे 26 दिवसांतील देशाला हे चौथे संबोधन असेल. यावेळी ते लॉकडाउन वाढवण्याबाबत घोषणी करू शकतात. याआधी त्यांनी 24 मार्च रोजी देशाला संबोधित करत कोरोनाशी लढण्यासाठी 25 मार्चपासून देशभरात लॉकडाउन लागू करण्याची घोषणा केली होती. 14 एप्रिल रोजी लॉकडाउनचा शेवटचा दिवस आहे.
Prime Minister @narendramodi will address the nation at 10 AM on 14th April 2020.
— PMO India (@PMOIndia) April 13, 2020
5 राज्यांमध्ये 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन
पंजाब, ओडिशा, तेलंगाना, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढला आहे. मागील शनिवारी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती. या बैठकीत 78 कोटी लोकसंख्या असलेल्या 13 राज्यांनी 30 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन वाढविण्याचे मान्य केले.
उद्योग मंत्रालयाची शिफारस - 15 प्रकारचे उद्योग आणि फळे आणि भाज्यांना सूट द्या
रविवारीच उद्योग व वाणिज्य मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये 15 प्रकारचे उद्योग सुरु करणे आणि फळे-भाज्यांची विक्री करणाऱ्यांना लॉकडाउनमध्ये सूट देण्याची शिफारस केली आहे.
यांवर बंदी राहण्याची शक्यता
सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि क्रीडासंबंधीत कार्यक्रमांवर बंदी कायम राहू शकते. तसेच चित्रपटगृहे, मॉल्स, पार्क, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, शाळा-महाविद्यालये देखील बंद राहू शकतात.
रेल्वे : केवळ निम्म्या जागांवर आरक्षण देण्याचा विचार
सरकार काही ठराविक मार्गांवर रेल्वे गाड्या सुरू करू शकते. असे मानले जाते की 30 एप्रिलनंतरही संपूर्ण क्षमता असलेल्या गाड्या सुरू करणे शक्य होणार नाही. म्हणून त्यांना हळू हळू सुरू करण्याची तयारी आहे.
स्टेशन स्थानकावर रेल्वे येण्यापूर्वी चार तासापर्यंत पोहोचणे आवश्यक असू शकते.
> रेल्वे गाड्यांत जनरल बोगी नसणार, एसी कोट नसण्याचीही शक्यता. फक्त रिझर्वेशन झाल्यावरच प्रवास होईल.
> सोशल डिस्टन्स लक्षात घेऊन केवळ निम्म्या जागांवर आरक्षण दिले जाईल.
>कोरोना संक्रमणाच्या हॉट स्पॉटवर गाड्या थांबणार नाहीत.
> प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग केली जाऊ शकते.
> फक्त रिझर्वेशन तिकीट असणारेच स्टेशनवर जाऊ शकतील.
> जास्त गर्दी टाळण्यासाठी, प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जाणार नाहीत.
निवडक देशांसाठी उड्डाणे सुरू करावीत : उद्योग मंत्रालयाची शिफारस
केंद्राच्या उद्योग व वाणिज्य मंत्रालयाने रविवारी रात्री अधिसूचना जारी करुन काही सूचना दिल्या आहेत. यामध्ये म्हटले की, फक्त ग्रीन झोनमध्ये लोकल ट्रान्सपोर्ट सुरू करण्याची सूट द्यावी. मात्र रेड आणि ऑरेंज झोनमध्ये लोकल ट्रान्सपोर्ट सुरू करू नये. भारताबाहेर जाण्यासाठी विशेष आणि व्यावसायिक उड्डाणांना सुट मिळावी. निवडक देशांसाठी उड्डाणे सुरू करावीत.
तीन झोन तयार करण्याची कल्पना
> रेड झोन : हॉटस्पॉट असणारे जिल्हे, जेथे आधीपासून सर्वकाही बंद आहे. > ऑरेंज झोन : ज्या जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्ण मिळाले नाहीत, जुने रुग्णांची संख्या कमी > ग्रीन झोन : संक्रमण मुक्त जिल्हे, तेथील व्यवसाय सुरू करावे
Sponsored By
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.