आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॅक्सपेअर चार्टर:प्रामाणिक करदात्यांसाठी पंतप्रधान मोदी लाँच करणार नवे व्यासपीठ, करदाते तसेच प्राप्तिकर विभाग यांच्यात विश्वासाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही सनद जाहीर करण्यामागे करदाते तसेच प्राप्तिकर विभाग यांच्यात विश्वासाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न

देशातील प्रामाणिक करदात्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी ११ वाजता नवे व्यासपीठ लाँच करतील. यात अशा करदात्यांसाठी काही सवलतीही असू शकतील. याच वेळी टॅक्सपेअर चार्टर अर्थात करदात्यांसाठी सनद लागू करण्याची घोषणाही केली जाऊ शकते. “पारदर्शी कर-प्रामाणिकपणाचा सन्मान’ असे हे व्यासपीठ असेल.

काय आहे टॅक्सपेअर चार्टर? सीए कीर्ती जोशी यांच्यानुसार, ही सनद जाहीर करण्यामागे करदाते तसेच प्राप्तिकर विभाग यांच्यात विश्वासाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे. यात करदात्यांच्या अडचणी कमी करून अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होईल. सध्या अशी सनद अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या तीनच देशांत लागू आहे. यातील प्रमुख मुद्दे असे-

१. करदात्यांना प्रामाणिक मानणे : जोवर करचोरी स्पष्ट होत नाही तोवर त्याचा सन्मान करणे.

२. कालबद्ध सेवा : अडचणींची त्वरित सोडवणूक आणि कालबद्ध पद्धतीने पर्यायी व्यवस्था करणे.

३. आदेश निघण्यापूर्वी छाननी : करदात्याविरुद्ध एखादा आदेश निघण्यापूर्वीच त्यासंबंधी पडताळणी.

४. विभागाचे उत्तरदायित्व : अधिकाऱ्याच्या चुकीमुळे करदात्याचे नुकसान होत असेल तर भरपाई.

बातम्या आणखी आहेत...