आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Modi Will Visit Stormy Bengal Odisha Tomorrow, Affecting More Than 20 Lakh People In Both The States

यास वादळामुळे प्रचंड नुकसान:पंतप्रधान मोदी उद्या वादळाग्रस्त बंगाल-ओडिशाचा दौरा करणार, दोन्ही राज्यात 20 लाखाहून अधिक लोक प्रभावित

कोलकाता/भुवनेश्वर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी वादळग्रस्त पश्चिम बंगाल आणि ओडिशाचा दौरा करतील. प्रथम ते ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे पोहोचतील आणि आढावा बैठक घेतील. यानंतर मोदी बालासोर, भद्रक आणि पूर्व मेदिनीपूर भागाचे हवाई सर्वेक्षण करतील. या जिल्ह्यांत चक्रीवादळाने सर्वाधिक नुकसान केले आहे. यानंतर, ते बंगालमध्ये आढावा बैठक घेतील.

दोन्ही राज्यात 20 लाखाहून अधिक लोक प्रभावित
बंगाल आणि ओडिशामध्ये विनाशानंतर, यास वादळ पुढे सरकले आहे, परंतु या वादळाने काही भागात खूप नुकसान झाले आहे. बंगाल आणि ओडिशामधील वादळामुळे सुमारे 2 दशलक्षाहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. पाऊस आणि घरे पडल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 3 जण ओडिशा आणि एक बंगालमधील आहे.

3 लाख लोकांचे घर उद्धवस्त
पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील दिघा, शंकरपूर, मंदारमनी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील, बखली, संदेशखली, सागर, फ्रेझरगंज, सुंदरवन इत्यादी ठिकाणी तसेच संपूर्ण बंगालमध्ये या वादळामुळे 3 लाख लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. 134 धरणांचे नुकसान झाले असून, दुरुस्तीचे काम सुरु आहे. बुधवारी येथे 130-145 किमी प्रति तासाच्या वेगाने वारा सुटला होता. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 28 आणि 29 मे रोजी वादळग्रस्त भागाचा हेलिकॉप्टरने दौरा करतील.

बातम्या आणखी आहेत...