आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Modi's Remarks At The Pravasi Bharatiya Sammelan, Ready To Protect Humanity With 2 Vaccines

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्मनिर्भर भारत:2 लसींसह मानवतेच्या रक्षणासाठी तयार, प्रवासी भारतीय संमेलनात पंतप्रधान मोदी यांचे उद्गार

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज भारतच असा देश आहे, जेथे लोकशाही मजबूत आणि सर्वात जिवंत आहे.

भारत एक नव्हे, दोन ‘मेड इन इंडिया’ कोरोना प्रतिबंधक लसींसह मानवतेच्या रक्षणासाठी सज्ज अाहे. जगाला कोविड-१९ पासून बचाव करण्यासाठी लसींची प्रतीक्षा तर आहेच, पण भारत कसा जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवतो याकडे जगाचे लक्ष लागून असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

कोविडविरोधातील लढाईवर मोदी म्हणाले, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी व बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांपैकी भारत एक आहे. महामारीच्या काळात भारत आत्मनिर्भर आणि शक्तिशाली झाला. शनिवारी सोळाव्या प्रवासी भारतीय संमेलनाला पंतप्रधान मोदींनी व्हर्च्युअल मार्गदर्शन केले. त्यांनी पीएम केअर्स फंडात प्रवासी भारतीयांच्या योगदानाचे कौतुक केले.

भारताची लोकशाही सर्वात जिवंत
पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या लोकशाहीबद्दल एकेकाळी संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आज भारतच असा देश आहे, जेथे लोकशाही मजबूत आणि सर्वात जिवंत आहे. मोदी म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा बोलले जायचे की, हा गरीब देश आहे, कमी शिकलेला देश आहे आणि तो एकजूट राहू शकणार नाही. लोकशाही येथे शक्यच नाही, असे म्हटले जायचे. मात्र आज भारत एकजूट असल्याचे वास्तव आहे.

बातम्या आणखी आहेत...