आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीआयआयमध्ये पंतप्रधान:ग्रोथ नक्कीच परत येईल, मेड इन इंडिया आणि मेड फॉर फॉरेन आता देशाची गरज : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मला भारताचे टॅलेंट आणि तंत्रज्ञानावर पूर्ण विश्वास - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इंडस्ट्री असोसिएशन सीआयआयच्या कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले की, अर्थव्यवस्थेला नक्कीच वेग येईल, आम्हाला कोरोनाविरूद्ध कठोर पावले उचलण्याची गरज आहे, परंतु अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावे लागेल. आज भारताने लॉकडाउनला मागे टाकत अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश केला आहे. या टप्प्यात अर्थव्यवस्थेचा मोठा भाग उघडला आहे. बराचसा भाग आठ दिवसांनंतर उघडेल. अर्थव्यवस्थेच्या वाढीस सुरुवात झाली आहे. 

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

माझा टॅलेंट आणि तंत्रज्ञानावर पूर्ण विश्वास आहे

125 वर्षांत सीआयआयला मजबूत करण्यासाठी योगदान देण्याऱ्यांना शुभेच्छा देतो. कोरोनाच्या या काळात अशाप्रकारचे ऑनलाइन इव्हेंट न्यू नॉर्मल होत चालले आहेत. ही मानवाची सर्वात मोठी ताकद असते. आपल्याला लोकांचे जीवन वाचवण्यासोबत अर्थव्यवस्थेला देखील मजबूत करायचे आहे. तुम्ही सर्व उद्योग जगतातील लोक शुभेच्छा पात्र आहात. मी गेटिंग ग्रोथ बॅकच्या पुढे जाऊन म्हणेल की, येस वी आर गेटिंग ग्रोथ बँक. अशा संकटप्रसंगी मी इतका आत्मविश्वासाने कसे बोलत आहे याबाबत तुम्हाला प्रश्न पडला असेल. याची अनेक कारणं आहेत. मला भारताचे टॅलेंट आणि तंत्रज्ञानावर पूर्ण विश्वास आहे. 

योग्य वेळी योग्य मार्गाने योग्य पावले उचलली

दुसऱ्या देशांच्या तुलना केल्यानंतर भारतात लॉकडाउनचा किती लाभ झाला हे माहीत होते. पण आता पुढे काय? उद्योग नेते म्हणून हा प्रश्न तुमच्या मनावर नक्कीच असेल की आपण काय करणार आहोत. आत्मनिर्भर भारत अभिनायाविषयी देखील तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील असा मला विश्वास आहे. ते स्वाभाविक आहे. कोरोनाविरुद्ध अर्थव्यवस्थेला पुन्हा मजबूत करने ही आपली मुख्य प्राधान्य आहे. 

जे निर्णय त्वरित घेणे गरजेचे आहे ते घेतले जात आहेत. तसेच, असे निर्णय घेतले आहे जे दीर्घ काळ मदत करतील. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेने गरीबांना तत्काळ लाभ देण्यात बरीच मदद मिळाली. 4 कोटी लोकांना राशन मिळाले. प्रवासी मजुरांसाठी देखील मोफत रेशन पाठवले जात आहे. गरीबांना 53 हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदत केली आहे.

आज भारत एका नव्या ग्रोथची झेप घेण्यास सज्ज

आमच्या निर्णयांमध्ये समावेश, गुंतवणूक, नाविन्य आणि पायाभूत सुविधांची झलक मिळेल. आज भारत एका नव्या ग्रोथची झेप घेण्यास सज्ज आहे. आपल्यासाठी रिफॉर्मचा अर्थ, निर्णय घेण्याचे साहस करणे. आयबीसी असो, बँक विलीनीकरण असो वा जीएसटी, आम्ही नेहमीच सरकारचा हस्तक्षेप कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

सरकार अशा धोरणात आज रिफॉर्म देखील करत आहे, ज्याची देशाने आशा सोडली होती. स्वातंत्र्यानंतर कृषी क्षेत्रात जे नियम बनवण्यात आले होते, त्यात शेतकऱ्यांना दलालांच्या हाती सोपवले होते. शेतकऱ्यांसोबत दशकांपासून होणाऱ्या अन्यायाला दूर करण्याची इच्छाशक्ती आमच्या सरकारने दाखवली. कायद्यात बदल झाल्यामुळे आता शेतक्यांना अधिकार मिळतील. यानुसार शेतकऱ्यांना आपल्या हक्कानुसार पिकाची विक्री करता येईल. गोदामात साठलेले धान्य आता इलेक्ट्रॉनिक व्यापारातूनही विक्री करता येईल. यासह, कृषी व्यवसायासाठी अनेक मार्ग उघडणार आहेत. यासह रोजगार वाढीसाठी कामगार सुधारणाही केल्या जात आहेत.

कोळसा क्षेत्राची शक्ती वाढवली

जगातील तिसरा मोठा देश, जिथे कोळसाचा साठा आहे, बिझनेस लीडर आहे, त्या देशात बाहेरून कोळसा येण्याचे कारण काय आहे? कधी सरकार तर कधी धोरणे अडथळे बनत होती. परंतु आता कोळसा क्षेत्रात व्यावसायिक खाण परवानगी देण्यात आली आहे. मिनरल माइनिंगमध्ये देखील कंपन्या एक्सप्लोरेशनसोबत माइनिंग देखील करू शकतात. 

सरकार ज्या दिशेने वाटचाल करीत आहे, त्याद्वारे की कोळसा क्षेत्रा, संशोधन क्षेत्र, उद्योग आणि युवकांना प्रत्येक गोष्टीत नवीन संधी मिळतील. सामरिक क्षेत्रात खासगी गुंतवणूक देखील शक्य झाली आहे.

एमएसएमई सेक्टरला देखील प्रोत्साहन दिले

एमएसएमई क्षेत्रातील कोट्यवधी युनिट्सचा देशाच्या जीडीपीच्या सुमारे 30% वाटा आहे. एमएसएमईची परिभाषा स्पष्ट करण्याची मागणी उद्योग क्षेत्रातून दीर्घ काळापासून होत होती. ही मागणी देखील पूर्ण झाली आहे. एमएसएमई आता चिंता न करता व्यवसाय करू शकतील. त्यांचे रेकॉर्ड राखण्यासाठी त्यांना इतर मार्गांचे अनुसरण करावे लागणार नाही. या क्षेत्रातील कोट्यावधी साथीदारांना फायदा व्हावा यासाठी 200 कोटी रुपयांच्या सरकारी खरेदीमध्ये जागतिक निविदा रद्द करण्यात आली आहे.

150 देशांची मदत केली

कोरोना संकटात प्रत्येकजण स्वतःला सावरण्यात व्यस्त आहे. अशा संकटप्रसंगी भारताने दीडशेहून अधिक देशांना वैद्यकीय पुरवठा पाठवून मानवतावादी कामे केली आहेत. विश्व एक विश्वासार्ह जोडीदार शोधत आहे. भारताकडे याची क्षमता आहे. उद्योगांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा. आज जगाचा भारतावरील विश्वास वाढला आहे आणि नवीन आशाही संप्रेषित झाली आहे.

आत्मनिर्भर भारताचा अर्थ

सीआयआयसारख्या संघटनांची जबाबदारी आहे की आपण एक पाऊल उचलले तर सरकार चार पाऊले टाकून आपली मदत करेल. पंतप्रधानाच्या नात्याने मी तुम्हाला याचा विश्वास देतो. तुमच्याकडे आत्मनिर्भर भारताचा एक मार्ग आहे. आत्मनिर्भर भारताचा अर्थ आहे की, आपण आणखी मजबूत होऊन जगाच्या अर्थव्यवस्थेसोबत इंटीग्रेटेड आणि सर्पोटिव्ह देखील होईल. 

आपल्याला स्थानिक पुरवठा साखळीत अशाप्रकारे गुंतवणूक करावी लागेल जी जागतिक पुरवठा साखळीत भारताचे स्थान बळकट करेल. मला वाटते की सीआयआयसारख्या संघटनांनाही फोर्स कोरोनाप्रमाणे पुढे यावे लागेल. जागतिक स्तरावर आपला बाजार वाढविण्यासाठी आपल्याला उद्योगास मदत करावी लागेल. आता भारतात अशी उत्पादने तयार करण्याची गरज आहे जी मेड इन इंडिया आणि मेड फॉर फॉरेन असतील. देशाची आयात कमी कशी करता येईल यावर विचार करण्याची गरज आहे.

जीडीपी वाढ 11 वर्षांच्या नीचांकावर 

सरकारने गेल्या शुक्रवारी जीडीपी ग्रोथचे आकडे जारी केले होते. चौथ्या तिमाहीत ग्रोथ रेट कमी होऊन 3.1 टक्के राहिला. त्याचबरोबर संपूर्ण आर्थिक वर्षात हे प्रमाण 4.2 टक्के होते. 11 वर्षांची ही सर्वात निचांक पातळी आहे. याआधी 2009 मध्ये जीडीपी ग्रोथ या स्तराजवळ होती. 

बातम्या आणखी आहेत...