आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी गुजरातच्या भरुचमध्ये आयोजित उत्कर्ष समारंभात व्हर्च्युअल हजेरी लावली. त्यात त्यांनी सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी एका अंध लाभार्थ्याशी संवाद साधताना ते चांगलेच भावूक झाले.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, पंतप्रधानांनी गुरुवारी विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांपैकी एक अयुब पटेल नामक व्यक्तीशी संवाद साधला. अयुब यांनी सांगितले की, ते सौदी अरेबियात होते. तिथे त्यांनी डोळ्यात एक आयड्रॉप टाकला. त्यानंतर त्यांची हळूहळू दृष्टी गेली. यावेळी त्यांनी आपल्या मुलीला डॉक्टर बनवण्याचे स्वप्नही मोदींना सांगितले.
त्यानंतर मोदींनी मुलीला डॉक्टर व्हावेसे का वाटते असे विचारले. त्यावर तिने हुंदका आवरत वडिलांची स्थिती पाहून आपण हा निर्णय घेतल्याचे सांगितले. हे ऐकून मोदीही भावूक झाले. तसेच त्यांनी त्यांच्यापुढे मदतीचा प्रस्ताव ठेवाल. ते म्हणाले -आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत हवी असेल तर मला सांगा.
गुजरात सरकारला शुभेच्छा
भरुच जिल्ह्यातील राज्य सरकारच्या 4 प्रमुख योजना 100 टक्के पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान म्हणाले की, सरकार प्रामाणिक संकल्पाने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते तेव्हा किती लफलदायी परिणाम होतात या वस्तुस्थितीचा पुरावा हा उत्कर्ष सोहळा आहे. मी भरुच जिल्हा प्रशासन व गुजरात सरकारला सामाजिक सुरक्षेशी संबंधित 4 योजना 100 टक्के अंमलात आणल्याप्रकरणी शुभेच्छा देतो.
पंतप्रधान म्हणाले -2014 मध्ये तुम्ही आम्हाला सेवेची संधी दिली. तेव्हा देशाची जवळपास अर्धी लोकसंख्या शौचालय, लसीकरण, वीज पुरवठा व बँक खात्याच्या सुविधेपासून वंचित होती. पण, आता सर्वांच्या प्रयत्नांमुळे अेक योजनांची 100 टक्के अंमलात येत आहेत. या सोहळ्याला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी भावूक होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळलेत. चला पाहुया असे काही क्षण...
राज्यसभेतील काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या निरोप समारंभावेळी मोदी भाषण देत असताना भावूक झाले होते.
कोरोना काळात स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे आरोग्य कर्मचारी व आघाडीवर तैनात कर्मचाऱ्यांची आठवण काढतानाही ते भावूक झाले होते.
2016 मध्ये मोदी बंगालच्या बेलूर मठात गेले होते. त्यांनी मठातील स्वामी विवेकानंदांची खोली उघडली असता ते भावूक झाले होते. विशेष म्हणजे मोदींनी जेव्हा साधू बनण्याची इच्छा व्यक्त केली होती, तेव्हा याच मठाने त्यांचा प्रस्ताव धूडकावून लावला होता. 2015 मध्ये फेसबूकच्या मुख्यालयात मार्क झुकरबर्ग यांच्याशी संवाद साधतानाही मोदी इमोश्नल झाले होते. झुकरबर्ग यांनी त्यांच्या मातोश्रीविषयी छेडले असता तेव्हा त्यांचे डोळे भरून आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.