आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Narendra Modi Hold India Australia Virtual Summit With Prime Minister Scott Morrison 7 Agreements With Defense And Technology, 2 Declarations

भारत-ऑस्ट्रेलिया व्हर्च्युअल समिट:संरक्षण आणि तंत्रज्ञानासह 7 करार, 2 घोषणा; मोदी म्हणाले- नाती मजबूत करण्यासाठी उत्तम काळ

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वर्षी ओसाका येथे जी -20 शिखर परिषदेत मोदी आणि स्कॉट मॉरिसन यांची भेट झाली होती
  • मोदींनी पहिल्यांदाच दुसर्‍या देशाच्या नेत्याशी व्हर्च्युअल चर्चा केली़
  • मॉरिसन मे महिन्यात भारत दौर्‍यावर येणार होते, पण हा दौरा रद्द करण्यात आला
Advertisement
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या गुरुवारी झालेल्या व्हर्च्युअर समिटमध्ये संरक्षण आणि तंत्रज्ञानासह 7 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आणि दोन घोषणा करण्यात आल्या. मोदी म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंध मजूबत करण्याची ही योग्य वेळ आहे. तर असेच होणार असल्याचे मॉरिसन म्हणाले. 

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये 7 करार आणि 2 घोषणा 

1. दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारीबाबत संयुक्त विधान (घोषणा)

2. इंडो-पॅसिफिकमधील सागरी सहकार्याबद्दल संयुक्त निवेदन. (घोषणा)

3. सायबर आणि सायबर सक्षम तंत्रज्ञान सहकार्य करार

4. खाण, खनिजांच्या प्रक्रियेच्या क्षेत्रात सहकार्यासाठी करार.

5. म्युच्युअल लॉजिस्टिक सपोर्टच्या व्यवस्था संबंधीत कागदपत्रांवर स्वाक्षरी.

6. संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञानात सहकार्यासाठी कागदपत्रांवर स्वाक्षरी  

7. सार्वजनिक प्रशासन आणि शासन सुधारणेच्या क्षेत्रात सहकार्याचे करार

8. व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणात सहकार्यासाठी करार.

9. जलसंपदा व्यवस्थापनासाठी करार

भारत-ऑस्ट्रेलिया संबंध इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी महत्त्वाचेः मोदी

मोदी म्हणाले की, आमच्या नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आज लोकशाही मूल्ये वेगवेगळ्या प्रकारे कमकुवत होत असताना आपण परस्पर संबंध बळकट केले पाहिजेत. केवळ दोन देशांसाठी नव्हे तर संपूर्ण इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी हे आवश्यक आहे. जगाला कोरोना साथीच्या रोगापासून दूर करण्यासाठी सौहार्दपूर्ण दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. भारताने ती एक संधी मानली आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात सुधारणा प्रक्रिया सुरू केली आहे, याचे परिणाम लवकरच समोर येईल.

भारत संकटांशी चांगल्याप्रकारे लढत आहे - मॉरिसन

मॉरिसन मोदींना म्हणाले की, आपण पहिल्यांदाच व्हर्च्युअल संवाद साधत आहोत. भारत-ऑस्ट्रेलियाची मूल्ये आणि लोकशाही एकसारखीच आहे. जग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढे जात आहे आणि आजचे संभाषण त्याचे एक उदाहरण आहे. कोरोना व इतर आपत्तींबद्दल मॉरिसन म्हणाले की, खरोखरच सर्व देशांसाठी ही कठीण वेळ आहे. अंफाम चक्रीवादळ आणि विशाखापट्टनममध्ये गॅसगळतीसारख्या घटना घडल्या. यादरम्यान आपण पुन्हा स्वत: ला सिद्ध केले. 

मोदींनी मॉरिसनला भारत भेटीसाठी आमंत्रित केले

मोदी म्हणाले की, आम्ही वैयक्तिकरित्या भेटू शकलो नाही, याबाबत खेद आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर आपण आपल्या परिवारासह भारतात या. मागील काही वर्षांपासून आपला तालमेल चांगला राहिला आहे. आमच्या नातेसंबंधांची नाळ आपल्यासारख्या मजबूक आणि दूरदर्शी नेत्याच्या हातात आहे ही आनंदाची बाब आहे. 

मॉरिसन म्हणाले - पुढच्या वेळी गुजराती खिचडीचा आस्वाद घेऊ 

मोदींनी मॉरिसनचे कौतुक केले आणि ते म्हणाले की तुम्ही कोरोना संकटात ऑस्ट्रेलियामध्ये राहणार्‍या भारतीय समुदायाची आणि विद्यार्थ्यांची ज्याप्रकारे काळजी घेतली याबद्दल मी त्याचे आभारी आहे. तर मॉरिसन म्हणाले की, भारतात येऊन तुम्हाला मिठी मारण्याची आणि तुमचे समोसे शेअर करण्याची इच्छा होती. पुढील वेळी गुजरातील खिचडी शेअर करू. आपल्या पुढच्या भेटीपूर्वी मी स्वयंपाकघरात गुजराती खिचडी बनवण्याचा प्रयत्न करेन.

Advertisement
0