आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Narendra Modi Is Destroying The Country Rahu Gandhi's Attack On Pm Modi

राहुल गांधींचा मोदींवर निशाणा:देशाला उद्ध्वस्त करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकांचा भ्रम लवकरच मोडणार आहे, राहुल गांधींचा हल्लाबोल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी गुरुवारी ट्विट केले की 'मोदी देशाला उद्धवस्त करत आहेत.'

'नोटाबंदी, जीएसटी, कोरोना साथीच्या काळात दुरावस्था, अर्थव्यवस्था आणि रोजगाराचा सत्यानाश. त्यांच्या भांडवलशाही माध्यमांनी एक भ्रम निर्माण केला आहे. हा भ्रम लवकरच तुटेल.' असे राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी बैठकीमध्ये केंद्रीय अधिकाऱ्यांना धोक्यात आलेल्या नोकऱ्यांविषयीची एक बातमी शेअर करत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. कोरोनाचा परिणाम झाल्यामुळे देशात 10कोटी नोकऱ्या संकटात आहे. असं केंद्र सरकारनं समितीला सांगितलं आहे. याविषयीची एक बातमी ट्विट करून राहुल गांधीनी मोदींवर हल्लाबोल केला.

तत्पूर्वी राहुल गांधींनी राफेल खरेदीसंदर्भात मोदी सरकारला प्रश्न विचारले होते. त्यांनी विचारले होते की, प्रत्येक विमानाची किंमत 526 कोटीऐवजी 1670 कोटी का दिली गेली? 126 ऐवजी केवळ 36 विमानांची खरेदी का करावी? दिवाळखोर अनिल अंबानी यांना एचएएलऐवजी 30 हजार कोटींचे कंत्राट का देण्यात आले?