आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Narendra Modi Launched The Challenge To Encourage Indian Application Developers And Innovators

माेदींचे तरुणाईला आव्हान:स्वदेशी अ‍ॅप बनवा; चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदीनंतर आत्मनिर्भर भारत अ‍ॅपवर भर

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • मोदींचे डिजिटल इंडिया आत्मनिर्भर भारत अ‍ॅप नावीन्यता आव्हान, 20 लाखांपर्यंतची पारिताेषिके

चीनच्या ५९ अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी तरुणांना आणि स्टार्टअप कंपन्यांना स्वदेशी माेबाइल अ‍ॅपची निर्मिती करण्याचे आवाहन केले आहे. नीती आयाेगाच्या ‘डिजिटल इंडिया आत्मनिर्भर भारत अ‍ॅप नावीन्यता आव्हान’ माेहिमेचा माेदींच्या हस्ते शनिवारी प्रारंभ झाला. त्यानंतर पंतप्रधान माेदी यांनी हे आवाहन केले. यासाठी प्रथम पारिताेषिक २० लाख, द्वितीय १५ लाख रुपये आणि तिसरे १० लाख रुपयांचे असेल. उपश्रेणीसाठीदेखील पहिले ५ लाख, दुसरे ३ लाख आणि तिसरे दाेन लाख रुपयांचे पारिताेषिक असेल.

या आठ श्रेणीतील अ‍ॅपनिर्मितीचे असेल युवकांसमोर आव्हान

कार्यालयीन कामे आणि वर्क फ्राॅम हाेम, साेशल नेटवर्किंग, ई-लर्निंग, मनाेरंजन, आराेग्य व निराेगी आयुष्य, कृषी तंत्रज्ञान, फिनटेससह व्यवसाय, बातम्या आणि क्रीडा या आठ श्रेणींमध्ये असलेल्या उपश्रेणींसाठीदेखील अ‍ॅपनिर्मिती करता येऊ शकेल. अ‍ॅपच्या विभिन्न श्रेणींसाठी पारिताेषिकही देण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...