आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Narendra Modi Meeting With States On Corona Crisis And Economic Activities

कोरोनावर मोदींची व्हिडिओ कॉन्फ्रंस:नरेंद्र मोदी सर्व मुख्यमंत्र्यांना म्हणाले- आरोग्याची पायाभूत सुविधा वाढविणे, ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असावी

v2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींनी गलवान घाटीत शहीद झालेल्या जवानांसाठी 2 मिनीटांचे मौन ठेवले

कोरोना प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लॉकडाउनमध्ये लाखो लोकांना ट्रेस करण्यात आले. आज देशातील प्रत्येग नागरिक व्हायरसबाबत जास्त सतर्क झाला आहे. आपल्याला हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर, इन्फॉर्मेशन सेक्टर, पब्लिक पार्टिसिपेशनवर जास्त भर द्यावी लागणार आहे. हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार, ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असावी. चाचण्यांवर आपल्याला भर द्यावी लागेल, म्हणजेच संक्रमितांना ट्रेस करुन उपचार करता येईल. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदी सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत आहेत. आज महाराष्ट्र, तमिळनाडू आणि दिल्लीसह सर्वात जास्त प्रभावित 15 राज्य-केंद्र शासित प्रदेशांसोबत व्हिडिओ कॉन्फ्रंस होत आहे.

6 राज्यांव्यतिरिक्त इतर राज्ये लिखीत स्वरुपात आपली बाजू माडंणार

मोदींच्या राज्यांसोबतच्या चर्चेत आज 6 मुख्यमंत्र्यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळू शकते. इतर राज्ये लिखीतमध्ये आपली बाजू मांडतील. मीटिंगमध्ये अनलॉक-1 वर राज्यांच्या फीडबॅक घेतला जाईल आणि यावर स्ट्रॅटर्जी प्लॅन केली जाईल. यापूर्वी मंगळवारी मोदींनी 21 राज्य-केंद्र शासित प्रदेशांसोबत चर्चा केली होती.

0