आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया:'सर्वच क्षेत्रामध्ये हा अर्थसंकल्प सकारात्मक बदल आणणारा ठरेल', पंतप्रधान नरेंद्र मोदींची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा आत्मनिर्भर भारताचा आत्मनिर्भर तसेच विकास आणि विश्वासाचा अर्थसंकल्प आहे आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान आता या अर्थसंकल्पावर सर्वांच्या प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. मोदी म्हणाले की, 'सर्व सामान्यांची जीवनशैली उंचावी यासाठी या अर्थसंल्पामध्ये जोर देण्यात आला आहे. यासोबतच सर्वच क्षेत्रामध्ये हा अर्थसंकल्प सकारात्मक बदल आणणारा ठरेल.' असे मोदी म्हणाले.

पुढे पंतप्रधान म्हणाले की, 'सर्व सामान्यांची जीवनशैली उंचावण्यावर या अर्थसंकल्पात प्रयत्न करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प सर्वच क्षेत्रात अत्यंत सकारात्मक बदल आणेल. मी यासाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन व त्यांचे सहकारी अनुराग ठाकूर व त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो. हा आत्मनिर्भर भारताचा आत्मनिर्भर तसेच विकास आणि विश्वासाचा अर्थसंकल्प आहे आहे.'

'2021 चा अर्थसंकल्प असाधारण परिस्थितींमध्ये सादर करण्यात आला. यामध्ये विकासाचा विश्वास आहे. कोरोनाने जगभरात जो प्रभाव निर्माण केला आहे, त्याने संपूर्ण मानव जातीला धक्का दिला. या परिस्थितीमध्ये आजचे बजेट भारताचा आत्मविश्वास दाखवणारा आहे.' असेही पंतप्रधान म्हणाले.

अर्थसंकल्प पारदर्शक असावा यासाठी सरकारचे प्रयत्न
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, 'सुरुवातीच्या एक दोन तासांमध्येच अर्थसंकल्पावर सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. असा अर्थसंकल्प पाहायला कमीच मिळतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तज्ज्ञांना वाटले होते की, सरकार सामान्य जनतेवरचा भार वाढवेल. मात्र आमच्या सरकारने सातत्याने अर्थसंकल्प पारदर्शक असावा यासाठी सातत्याने प्रयत्न केला. मला आनंद आहे की, आज अनेक तज्ज्ञांनी या अर्थसंकल्पाच्या पारदर्शकतेचे कौतुक केले.'

बातम्या आणखी आहेत...