आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने बनलेल्या आणि डाव्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या JNU मध्ये गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्चुअली आल् होते. त्यांनी येथील स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीचे अनावरण केले. ही मुर्ती जेएनयूच्या कॅम्पसमध्ये असून, 2018 पासून झाकून ठेवण्यात आली होती. व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे केलेल्या संबोधनात मोदी म्हणाले की, पोट भरलेले असेल, तर डिबेटमध्ये मजा येते. तुमच्या कल्पना, डिबेट, डिस्कशनची भूक जी, साबरमती धाब्यात भागत होती. हीच भूक आता स्वामीजींच्या प्रतिमेच्या छत्रछायेखाली भागवा.
विवेकानंदांकडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते: मोदी
मोदी म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांची मूर्ती स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देतात. यातून सशक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते. स्वामी विवेकानंद यांना माहित होते की, भारत जगाला काय देऊ शकतो. एक शतकापूर्वी स्वामी विवेकानंदांनी मिशीगन यूनिव्हर्सिटीमध्ये याची घोषणा केली होती. स्वामीजींनी स्वतःची ओळख विसरत असलेल्या भारताला नवी चेतना दिली होती.
मोदी पुढे म्हणाले की, स्वामी विवेकानंद म्हणायचे की, मूर्तीमध्ये आस्था ठेवल्याने तुम्हाला त्यातून व्हिजन ऑफ इम्युनिटी मिळते. जेएनयूमधील हा पुतळा विवेकानंद प्रत्येक तरूणात पाहू इच्छित असलेली हिम्मत आणि धैर्य असावे अशी माझी इच्छा आहे. या पुतळ्यामुळे आम्हाला देशाबद्दल अपार श्रद्धा, प्रेम शिकायला मिळते. हा स्वामीजीच्या आयुष्यातील सर्वात मोठा संदेश आहे. ही मूर्ती देशाला व्हिजन ऑफ वननेससाठी प्रेरित करते. ही मूर्ती देशाला यूथ डेव्हलपमेंटसोबत पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.