आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारीख निश्चित:पंतप्रधान नरेंद्र मोदी - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची भेट ठरताच अमेरिकेची पाकिस्तानला वेसण

नवी दिल्ली/वॉशिंग्टन5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जो बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या अमेरिका दौऱ्याचा कार्यक्रम ठरला आहे. अमेरिका २४ सप्टेंबरला प्रथमच ४ देशांचा समूह क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉगचे (क्वाॅड) शिखर परिषद घेत आहे. त्यात पंतप्रधान मोदीही भाग घेतील. कोरोनाकाळात ही प्रत्यक्ष उपस्थिती असलेली पहिलीच क्वाॅड परिषद असेल. त्यात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडेन व पंतप्रधान मोदींची पहिलीच थेट समोरासमोर भेट होईल. अफगाणिस्तानहून अमेरिकेची वापसी व तालिबान सत्तारूढ झाल्याच्या काळात शिखर परिषदेचे महत्त्व वाढले आहे. परिषदेची तारीख निश्चित होताच अमेरिकेने तालिबानशी जवळिकीवरून पाकिस्तानवर कठोर भूमिका दाखवणे सुरू केले आहे. अमेरिकी परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन म्हणाले, अमेरिका आगामी दिवसांत पाकिस्तानसोबतच्या संबंधांचा आढावा घेणार आहे. अफगािणस्तानच्या घटनाक्रमाच्या संदर्भात सोमवारी संसदेच्या परराष्ट्र प्रकरणाच्या समितीसमोर त्यांनी ब्लिंकेन यांनी हे वक्तव्य केले आहे.

माेदी २५ ला यूएन आमसभेलाही संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र माेदी २५ सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेच्या ७६ व्या सत्राच्या सर्वसाधारण सभेलाही संबोधित करतील. यात १०० पेक्षा जास्त देश व सरकारांचे प्रमुख प्रत्यक्षरीत्या भाग घेतील. कोरोनामुळे २०२० मध्ये ही बैठक ऑनलाइन झाली होती. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन पहिल्यांदाच आमसभेला संबोधित करण्यासाठी न्यूयॉर्कला जातील.

ऑस्ट्रेलिया व जपानचे पंतप्रधानही येणार : क्वाॅड शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आपले समकक्ष- ऑस्ट्रेलियाचे स्कॉट मॉरिसन व जपानच्या योशीहिदे सुगा यांच्यासोबत सहभागी होतील. संघटनेचा चौथा सदस्य अमेरिका आहे. या संघटनेला अघाेषितरीत्या चीनच्या विरोधातील आघाडी म्हणून समजले जाते.

चीन म्हणाला, एखाद्या देशाला टार्गेेट करणाऱ्या संघटनेला कोणतेही भविष्य नाही : क्वॉडवर चिनी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, ‘दुसऱ्या देशाला टार्गेट करण्याच्या इराद्याने स्थापन संघटनांचे भविष्य नाही. त्या लाेकप्रिय होणार नाहीत.’

आगामी दिवसांत पाकिस्तानसोबतच्या संबंधांचा आढावा घेणार अमेरिका...
पाकिस्तान हक्कानी नेटवर्कच्या अतिरेक्यांसह तालिबानला पाेसत आला आहे. दुसरीकडे दहशतवादविराेधी कारवायांत आम्हालाही मदत करत आहे. पाकिस्तात सातत्याने दोन्ही डगरींवर पाय ठेवून आहे. अमेरिका आता पाकिस्तानच्या भूमिकेवर विचार करणार आहे. तसेच आगामी दिवसांत पाकिस्तान कोणत्या भूमिकेत असायला हवा, हेदेखील पाहिले जाणार आहे.- अँटनी ब्लिंकेन, अमेरिकी परराष्ट्रमंत्री

एक्स्पर्ट व्ह्य ू: भारताला अपेक्षा कोराेनाबाबत अमेरिकेच्या सहकार्याची, तर बायडेन यांचा भर हवामान बदलांवर
बायडेन आपल्या पहिल्या क्वाॅड परिषदेला ऐतिहासिक करू पाहतील. काेरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला अमेरिकी सहकार्य हवे आहे, तर बायडेन प्रशासनाचा भर हवामान बदलांच्या मुद्द्यावर आहे. सायबर सुरक्षा व नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य चारही क्वाॅड देशांसाठी सकल हिताचा मुद्दा आहे. भारताने या बैठकीत उन्नत तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानासाठी पायाभूत सहमतीचे उद्दिष्ट ठेवले आहे. क्वाॅडचे देश आपली संसाधने एकजूट करून चीनला प्रत्युत्तर देऊ पाहत आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानावर सकल कटिबद्धता जाहीर करण्यासाठी ही उपयुक्त वेळ असल्याचे बायडेन यांच्या प्रेस सचिवांनीही स्पष्ट केले आहे. हिंदी महासागरात चीनचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मुक्त विहाराचा मुद्दा भारत महत्त्वाचा मानतो. चीनचे नाव घेतल्याविना क्वॉडचे देश याबाबत आपले मत मांडतील. आजवर क्वाॅडच्या वक्तव्यांत दहशतवादाचा उल्लेख झाला नाही. मात्र या वेळी अफगािणस्तानमुळे दहशतवादाविरुद्ध आवाज बुलंद केला जाईल. : राजीव नयन, वरिष्ठ संशोधन सहायक, मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिस

बातम्या आणखी आहेत...