आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Narendra Modi Visits Lal Krishna Advani's Residence To Celebrate Advani's Birthday

93 वर्षांचे झाले आडवाणी:मोदींनी लालकृष्ण आडवाणींच्या घरी जाऊन वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा, पाय पडून आशीर्वाद घेत खाऊ घातला केक

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आडवाणींचा जन्म पाकिस्तानच्या कराचीमध्ये 8 नोव्हेंबर 1927 ला एका हिंदू-सिंधी कुटुंबात झाला.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी 93 वर्षांचे झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. मोदींनी आडवाणींचे पाय पडून आशीर्वाद घेतले. तसेच लॉनमध्ये बसून बातचितही केली. आडवाणींची मुलगी प्रतिक्षा केक घेऊन आल्या, मोदींनी आडवाणींचा हात पकडून त्यांचा केक कट केला आणि दोघांनी एकमेकांना खाऊ घातला. मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डाही होते.

मोदी म्हणाले - आडवाणी देशासाठी प्रेरणा
मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आडवाणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विट करत म्हटले की, 'भाजपला जन-जनपर्यंत पोहोचवण्यासोबतच देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे श्रद्धेय श्री लालकृष्ण आडवाणी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ते पक्षाच्या कोट्यावधी कार्यकर्त्यांसोबतच देशवासियांचे प्रेरणास्रोत आहेत. मी त्यांचे दिर्घायुष्य आणि स्वस्थ जीवनासाठी प्रार्थना करतो.'

आडवाणी 2002 ते 2004 या काळात अटक बिहारी वाजपेयी सरकारमध्ये 7 वे उप-प्रधानमंत्री राहिले होते. यापूर्वी 1998 ते 2004 च्या काळात NDA सरकारमध्ये गृहमंत्री राहिले होते. ते भाजपचे फाउंडर मेंबर्समध्ये सामिल आहेत. 2015 मध्ये त्यांना पद्मविभूषण मिळाले होते.

आडवाणींचा जन्म पाकिस्तानच्या कराचीमध्ये 8 नोव्हेंबर 1927 ला एका हिंदू-सिंधी कुटुंबात झाला. प्रायमरी एज्युकेशन कराचीच्या सेंट पॅट्रिक हाय स्कूलमधून झाले. यानंतर त्यांनी हैदराबाद (सिंध) च्या डीजी नॅशनल स्कूलमध्ये अॅडमिशन घेतले. फाळणीवेळी त्यांचे कुटुंब पाकिस्तान सोडून मुंबईत आले. येथे त्यांनी लॉ कॉलेज ऑफ द बॉम्बे यूनिव्हर्सिटीमधून कायदेशीर शिक्षण घेतले.

बातम्या आणखी आहेत...