आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या रावणावरील वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे. गुजरातमधील पंचमहाल प्रांतातील कलोल येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
कॉंग्रेसमध्ये शिवीगाळ करण्याची स्पर्धा
ते म्हणाले की, काँग्रेस नेत्यांमध्ये मला शिवीगाळ करण्याची स्पर्धा लागली आहे. पण त्यांनी हे लक्षात ठेवले पाहीजे की, जितका चिखल टाकला जाईल, तितकेच कमळ अधिक फुलणार आहे. विशेष बाब म्हणजे, कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुरतमधल जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना रावणाशी केली होती.
कोणी रावण, कोणी राक्ष स,तर कोणी झुरळ म्हणतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भगवान रामाचे अस्तित्व आणि अयोध्येत बनविले जात असलेल्या मंदिरावर कॉंग्रेसचा विश्वास नाही. एवढेच नाही तर कॉंग्रेसचे लोक तर रामसेतूचा देखील विरोध करतात. पण मला शिव्या देण्यासाठी ते रामायणातील रावणाचा उल्लेख करतात. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका नेत्याने PM मोदी कुत्ते की मौत मरेगा असे वक्तव्य केले होते. तर कोणी म्हणाले की, मोदी हिटलर की मौत मरेगा, तर कोणी रावण म्हणून राक्षस म्हणते तर कोणी झुरळ म्हणून मला हिनवत आहेत. पण मी त्याची चिंता करित नसल्याचे पीएम मोदी म्हणाले. ॉ
सर्वात पहिले वाचा खरगें यांचे रावणाचे वक्तव्य
गुजरात निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचारात काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वक्तव्य केले आहे. सोमवारी अहमदाबादमध्ये जाहीर सभेत खरगे म्हणाले की, मोदींची रावणासारखी 100 तोंडे आहेत का? मला कळत नाही. रविवारी सुरतमधील जाहीर सभेत खरगे यांनी स्वत:ला अस्पृश्य म्हटले आणि पंतप्रधान मोदी हे खोटे बोलणारे नेते ठरवले होते. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कॉंग्रेस अध्यक्ष म्हणाले- आम्ही अस्पृश्य
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दोन दिवस गुजरातमध्ये आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीत त्यांची रविवारी दोन ठिकाणी सभा झाल्या. तर आज सोमवारी देखील ते विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत. दरम्यान, सुरतमधील जाहीर सभेत त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. यावेळी खरगे यांनी स्वत:ला अस्पृश्य असल्याचे म्हटले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलणारे नेते असल्याचा घणाघात केला. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.