आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vidhan Sabha Election 2022 | Prime Minister Narendra Modi Will Be The Face Of BJP In The Upcoming Assembly Elections

भाजपची रणनीती:आगामी विधानसभा निवडणुकांत भाजप पुढे करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच चेहरा

सुजित ठाकूर | नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पक्षात असंतोष नको म्हणून सामूहिक नेतृत्वाचा ठेवला पर्याय

2023 पर्यंत होणाऱ्या सर्व विधानसभा निवडणुकांत भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच चेहरा वापरेल. या निवडणुका सामूहिक नेतृत्वाखाली लढवल्या जातील. कुणालाही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले जाणार नाही. मात्र, विद्यमान मुख्यमंत्र्यांना निवडणूक जिंकल्यानंतरही मुख्यमंत्रिपदी कायम राहण्याची संधी मिळू शकते. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षाच्या शेवटी निवडणुका आहेत.

तर पुढील वर्षी कर्नाटक, त्रिपुरा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हिमाचल, गुजरात, त्रिपुरा आणि मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. अलीकडेच, संसदीय मंडळाच्या पुनर्गठनानंतर, सत्ताधारी राज्यांच्या नेतृत्वाविराेधात मत तयार हाेत आहे, हे प्रमुख नेत्यांनी मान्य केले होते. संघटनाबाबतही तक्रारी आहेत. संघटनात्मक पातळीवर सातत्य आणि एकरूपतेचा अभाव आहे. अशा स्थितीत विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याचा पर्याय टाळण्याची गरज आहे.

ज्या राज्यांत विरोधी पक्षांत तिथेही मोदींचाच चेहरा

भाजप विरोधी पक्ष असलेल्या राज्यांमध्येही पक्ष मोदींचा चेहरा घेऊन सामूहिक नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात असा एकही मुख्यमंत्री नाही, ज्याची लोकप्रियता 25 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तर पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख 75 टक्क्यांच्या वर आहे. अशा स्थितीत कोणत्याही विद्यमान मुख्यमंत्र्यांची प्रतिमा उभी करून असंतोष निर्माण करणे पक्षाला परवडणारे नाही.

बातम्या आणखी आहेत...