आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Narendra Modi Four Public Meetings I Gujarat Elaction Meeting I Amit Shaha In Gujrat Two Days I Latest News And Update 

गुजरातमध्ये PM मोदी:म्हणाले - नर्मदा प्रकल्प रोखणारे काँग्रेस नेत्यासोबत पदयात्रा करत आहेत; राहुल गांधींवर निशाणा

गांधीनगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या 3 दिवसीय दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ते सोमनाथ मंदिरात पोहोचले. त्यानंतर वेरावळ, धोराची व बोटादमधील प्रचारसभेला संबोधित केले. धोराजीतील सभेत त्यांनी राहुल गांधींचे नाव न घेता त्यांच्या भारत जोडो यात्रेवर निशाणा साधला. ते म्हणाले- 'काँग्रेस नेते नर्मदा धरण तब्बल 3 दशकांपर्यंत ठप्प ठेवणाऱ्या महिलेसोबत पदयात्रा काढत आहेत. या लोकांमुळे गुजरातला विश्व बँकेचा एक पैसाही मिळाला नव्हता. आम्ही नर्मदा प्रकल्प पुढे रेटला नसता तर आज काय झाले असते?'

सोमनाथ मंदिरात मोदींनी भगवान भोलेनाथ यांचा पंचामृत अभिषेक केला. चांदीच्या कलशातून महादेवाला पाणी घातले. सोमनाथाचा बारा ज्योर्तिलिंगात समावेश होतो. मोदी 5 वर्षांनी सोमनाथला आले. यापूर्वी ते 2017 मध्ये येथे आले होते.

पंतप्रधान म्हणाले - भाजप पुन्हा जिंकत आहे
वेरावळ येथील सद्भावना मैदानावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केले. ते म्हणाले की, निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. जनतेला मतदान करण्याचे आवाहन करताना PM म्हणाले की, यावेळी मतदान केंद्रातील सर्व रेकॉर्ड तोडायचे आहेत. ते म्हणाले की, सर्व निवडणुकांचे सर्वेक्षण, आकडेवारी आणि वृत्तवाहिन्या सांगत आहेत की, यावेळी देखील पुन्हा भाजपचा विजय होत आहे.

पीएम मोदी पुढे बोलताना म्हणाले की, लोक मला विचारतात की तुम्ही एवढे का धावपळ करता? तेव्हा मी सांगतो की, कारण ते माझे कर्तव्य आहे. मी तुमच्यासाठी माझे कर्तव्य करतो. त्यामुळे तुम्हीही मतदान करून कर्तव्य बजवावे, अशी आशा व्यक्त केली.

गुजरात जगभरात नावलौकिक होतोय
दोन दशकांपूर्वी गुजरात किती मागासलेला होता, असे पंतप्रधान म्हणाले. किनारी भागात फक्त खारे पाणी होते. आमच्यासाठी पिण्याचे पाणीही नव्हते. पण, आज गुजरात कुठे आहे, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आज हा समुद्रकिनारा हा परिसर जगभरात पसरला आहे. गुजरातची ख्याती जगभर पसरली आहे.

सौराष्ट्र भागातील 4 सभांना संबोधित करणार

शनिवारी त्यांनी वलसाड जिल्ह्यातील वापी येथे 11 किलोमीटर लांबीचा रोड शो केल्यानंतर एका जाहीर सभेला संबोधित केले. कोणत्याही पक्षाचे नाव न घेता पंतप्रधान म्हणाले की, गुजरात आणि गुजरातींना बदनाम करण्यासाठी टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत. त्याची तुम्ही सर्वांनी काळजी घ्यावी.

फोटोद्वारे पाहा PM मोदींचा दौरा

पीएम मोदींनी सोमनाथ मंदिरात जाऊन पूजाअर्चा केली. यापूर्वी ते येथे 2017 साली आले होते.
पीएम मोदींनी सोमनाथ मंदिरात जाऊन पूजाअर्चा केली. यापूर्वी ते येथे 2017 साली आले होते.
शनिवारी उशिरा 11 किलोमीटरचा रोड शो केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले.
शनिवारी उशिरा 11 किलोमीटरचा रोड शो केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले.

दोन दिवसांत पंतप्रधानांच्या 8 जाहीर सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संध्याकाळी दमण ते वापी असा रोड शो केला. वलसाड येथे जाहीर सभेला संबोधित केले. यानंतर त्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात सहभाग घेतला. पुढील दोन दिवसांत पंतप्रधान मध्य गुजरात, दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये 8 जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यात 2 जाहीर सभा घेणार आहेत. यामध्ये तापीच्या निझर गावात आणि नर्मदेच्या डेडियापाडाचा समावेश आहे.

पंतप्रधान म्हणाले, गुजरातला बदनाम करण्यासाठी टोळी सक्रिय
गुजरात आणि गुजरातींना बदनाम करण्यासाठी देशात टोळ्या सक्रिय होत आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी सांगितले. याबाबत आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. गुजराती जिथे जिथे गेले तिथे ते दुधात साखरेसारखे विरघळले. गुजरातमध्ये जो येईल त्याला आम्ही आलिंगन देतो, पण गुजरातला रिव्हर्स गियरमध्ये टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही स्वीकारू शकत नाही. गुजरातला बदनाम करणाऱ्या घटकांना येथे स्थान नाही.

1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे
राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान ५ डिसेंबरला होणार आहे. त्याचबरोबर दोन्ही टप्प्यातील मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेची राजपत्र अधिसूचना ५ नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी १० नोव्हेंबरला जारी करण्यात आली. पहिल्या टप्प्यासाठी 15 नोव्हेंबरला छाननी होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 18 नोव्हेंबर आहे. पहिल्या टप्प्यासाठी 17 नोव्हेंबर आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 21 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...