आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Narendra Modi's Cabinet Will Have 43 New Ministers, List Of Ministers In New Cabinet Of Pm Narendra Modi

कॅबिनेट विस्तार:मंत्री बनणाऱ्या 43 खासदारांची यादी जाहीर, शपथ घेण्यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांनी घेतली बैठक

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नियमांनुसार मोदी मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 81 मंत्री असू शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. आज एकूण 43 मंत्री शपथ घेतील. शपथ घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवनियुक्त मंत्र्यांसमवेत बैठक घेतली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत ज्योतिरादित्य सिंधिया आणि सर्वानंद सोनोवाल हे सर्व संभाव्य मंत्री उपस्थित होते. पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि भाजपाचे राष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस बी.एल. संतोष उपस्थित होते.

आज शपथ घेणाऱ्या 43 मंत्र्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. नियमांनुसार मोदी मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 81 मंत्री असू शकतात. आज ज्या मंत्र्यांना शपथ दिली जाईल त्यांच्यात काही सध्याचे राज्यमंत्रीही असतील, ज्यांना कॅबिनेटमध्ये प्रमोट केले जाऊ शकते.

मोदींच्या टीमचे नवीन चेहरे
1. नारायण राणे 2. सर्वानंद सोनोवाल 3. वीरेंद्र कुमरा 4. ज्योतिरादित्य सिंधिया 5. आरसीपी सिंह 6. अश्विनी वैष्णव 7. पशुपति कुमार पारस 8. किरण रिजिजू 9. राजकुमार सिंह 10. हरदीप सिंह पुरी 11. मनसुख मंडाविया 12. भूपेंद्र यादव 13. पुरुषोत्तम रूपाला 14. जी किशन रेड्डी 15. अनुराग ठाकुर 16. पंकज चौधरी 17. अनुप्रिया पटेल 18. सत्यपाल सिंह बघेल 19. राजीव चंद्रशेखर 20. शोभा करंदलाजे 21. भानुप्रताप सिंह वर्मा 22. दर्शना विक्रम जरदोश 23. मीनाक्षी लेखी 24. अन्नपूर्णा लेखी 25. ए नारायण स्वामी 26. कौशल किशोर 27. अजय भट्ट 28. बीएल वर्मा 29. अजय कुमार 30. देवसिंह चौहान 31. भगवंत खूबा 32. कपिल पाटिल 33. प्रतिमा भौमिक 34. सुभाष सरकार 35. भागवत कृष्ण राव कराड़ 36. राजकुमार रंजन सिंह 37. भारती प्रवीण पवार 38. विश्वेश्वर टुडू 39. शांतनु ठाकुर 40. महेंद्र भाई मुंजापारा 41. जॉन बारला 42. एल मुरुगन 43. नीतीश प्रामाणिक

बातम्या आणखी आहेत...