आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Narendra Modi's Journey Through Pakistan's Airspace; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून प्रवास; तीन वेळा नकारघंटा वाजवल्यानंतर या वेळी दिली परवानगी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूएनच्या बैठकीसाठी मोदी अमेरिकेत दाखल; कोरोना काळातील दुसरा परदेश दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी तीन दिवसांच्या दौऱ्यावर अमेरिकेत पोहोचले. त्यांचे विशेष विमान अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीऐवजी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून गेले. पाकिस्तानने त्यासाठी परवानगी दिली होती. यापूर्वी काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्याच्या विरोधात पाकिस्तानने २०१९ मध्ये राष्ट्रपतींना तर तीन वेळा पंतप्रधानांना आपल्या हवाई हद्दीतून जाण्यास परवानगी नाकारली होती.

भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनला पोहोचले. त्यानंतर लगेचच त्यांनी कोविड परिषदेला संबोधित केले. मोदी म्हणाले, ‘कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान जग एका कुटुंबाप्रमाणे भारतासोबत उभे होते. भारतासाठी एकजूट झाल्याबद्दल आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.’ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले, ‘भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांच्या भागीदारीतून १०० कोटी डोस भारतात तयार करण्यास मदत मिळेल. त्यामुळे २०२२ च्या अखेरपर्यंत जगभरात लसीचा पुरवठा केला जाईल.’

  • २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा ७ वा तर २०१९ नंतरचा पहिला अमेरिका दौरा आहे.
  • कोरोना काळात बांगलादेशनंतर त्यांचा हा दुसरा विदेश दौरा आहे.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी प्रथमच प्रत्यक्ष भेट होईल.

तीन दिवस बैठका : क्वाड परिषद, संयुक्त राष्ट्रांत भाषण
२३ सप्टेंबर :
अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्यासोबत क्वालकॉम, अॅडोब यांसारख्या कंपन्यांच्या प्रमुखांशी भेट. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासोबत बैठकीची शक्यता. ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा.
२४ सप्टेंबर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा. क्वाड नेत्यांसोबत व्हाइट हाऊसमध्ये बैठक.
२५ सप्टेंबर : संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या सत्रात भाषण. २६ सप्टेंबरला भारतात परत.

बातम्या आणखी आहेत...