आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Narendra Modi's New Cabinet Updates 7 June 2021; News And Live Updates

मोदी 2.0 मध्ये पहिला फेरबदल:​​​​​​​अबकी बार... जंबो सरकार; पंतप्रधानांचा वर्ग - शपथविधीआधी मोदींनी नव्या मंत्र्यांना दिला राजकीय मंत्र; 36 नव्या चेहऱ्यांत महाराष्ट्राचे 4

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राणे यांना लघुउद्योग, राज्यमंत्र्यांमध्ये डॉ. कराड यांना अर्थ, कपिल पाटील पंचायती राज, डॉ. भारतींना आरोग्य

कोरोना महामारी व्यवस्थापन आणि आर्थिक आघाडीवर प्रश्नांचा सामना करत असलेल्या केंद्र सरकारमध्ये बुधवारी मोठा बदल झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करत ३६ नव्या चेहऱ्यांचा समावेश केला. ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यात १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्री आहेत. सात राज्यमंत्र्यांना बढती मिळाली आहे. त्यासोबतच टीम मोदीमध्ये ७७ मंत्री झाले. सध्या ६ मंत्रिपदे रिक्त आहेत. या फेरबदलात आरोग्य, शिक्षण, कायदा आणि माहिती-प्रसारण यांसारख्या मोठ्या विभागांच्या कॅबिनेट मंत्र्यांना वगळण्यात आले.

विस्तारात यूपी आणि गुजरात यांसारख्या पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असलेल्या राज्यांवर फोकस राहिला. सर्वाधिक ७ मंत्री यूपी आणि ५ गुजरातमधीलच आहेत. महाराष्ट्र व बंगालमधून ४-४ आणि कर्नाटकमधून ३ मंत्र्यांचा समावेश झाला आहे. विस्तारात जातीय आणि प्रादेशिक समीकरणे साधली आहेत. त्याचबरोबर उच्चशिक्षित, व्यावसायिक, प्रशासकीय अनुभव असलेले माजी नोकरशहा आणि तरुणांना सरकारमध्ये स्थान देण्यात आले आहे. पीएम मोदींनी मंत्र्यांची कामगिरी आणि भविष्यातील राजकीय गरजा लक्षात घेऊन आपल्या टीमध्ये बदल केले.

सायंकाळी सहा वाजता सुरू झालेल्या समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वात आधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली. त्यानंतर सर्वानंद सोनोवाल, मप्रच्या टीकमगढचे खासदार वीरेंद्रकुमार, काँग्रेसमधून भाजपत आलेले ज्योतिरादित्य शिंदे, संघटनेत सक्रिय भूपेंद्र यादव, ओडिशातील राज्यसभा सदस्य अश्विनी वैष्णव यांच्यासह १५ नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात जदयूचे आर. सी. पी. सिंह आणि लोजपचे पशुपतीकुमार पारस यांचाही समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...