आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान २२ फेब्रुवारी राेजी काेलकाता भेटीवर जाणार आहेत. त्यांचा हा एका महिन्यातील तिसरा दाैरा आहे. फेब्रुवारीच्या १८-१९ राेजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बंगालच्या काकद्वीपमध्ये हाेते. ११ फेब्रुवारीला शहा यांच्या कार्यक्रमाचे कुचबिहार येथे आयाेजन करण्यात आले हाेते. सात फेब्रुवारीला माेदींच्या हस्ते हल्दियात काही विकास याेजनांचे उद्घाटन झाले हाेते. सहा फेब्रुवारीला भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा नादियात हाेते. तेथे परिवर्तन यात्रेची सुरुवात झाली. ३० जानेवारीला शहांनी व्हिडिआे काॅन्फरन्सद्वारे बंगालमधील सभेला संबाेधित केले. २३ जानेवारीला पंतप्रधानांनी नेताजी सुभाष चंद्र बाेस यांच्या १२५ व्या जयंती समारंभात संबाेधित केले हाेते. भाजपच्या तीन आघाडीच्या नेत्यांच्या प्रचाराची ही लहानशी यादी म्हणता येईल. परंतु त्यावरून बंगालमध्ये भाजप व्यापक तयारीने निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे समजू शकते. बंगालमध्ये एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्याबद्दलची घाेेषणा पुढील महिन्यात केव्हाही हाेऊ शकते.या आधी भाजपने सत्ताधारी तृणमूलचा प्रतिस्पर्धी म्हणून स्वत:ची आेळख मांडली. काँग्रेसचेे राहुल गांधी, प्रियंका गांधी-वढेरा, साेनिया गांधींसारख्या आघाडीचे नेत्यांपैकी काेणीही बंगालचा दाैरा केलेला नाही.
विधानसभा निवडणूक, पक्षाच्या रणनीतीवर मंथन
कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनादरम्यान भाजपने राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक पार पडली. एनडीएमसी कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित बैठकीचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. या बैठकीत कृषी क्षेत्रातील सुधारणा व कोरोनाविरोधातील यशस्वी नेतृत्वाबद्दल धन्यवाद प्रस्ताव पारित केला. नड्डा यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला विविध राज्यांचे प्रभारी, सहप्रभारी सहभागी झाले होते.
काँग्रेसचे माेठे नेते बंगालपासून दूर
बंगालसारख्या महत्त्वाच्या राज्यात काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियंका गांधी इत्यादी नेते आतापर्यंत फिरकलेले नाहीत. सध्या निवडणूक प्रचार, व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी अधीर रंजन चाैधरी यांच्यावर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने डाव्या पक्षांसह निवडणूक लढवण्यासाठी आघाडी केली आहे. त्यानुसार काँग्रेस ९३ जागांवर निवडणूक लढवेल, असे पक्षाने १८ फेब्रुवारीला जाहीर केले हाेते.
याेगी आदित्यनाथ केरळ, राजनाथ तामिळनाडूत
बंगाल, आसामसह केरळ व तामिळनाडूत एप्रिल-मेमध्येदेखील निवडणूक हाेणार आहे. भाजपची तेथेही जाेरदार तयारी सुरू आहे. केरळमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांच्या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. तेथे भाजपच्या ‘विजय संकल्प यात्रे’ची सुरुवात त्यांच्या हस्ते हाेणार आहे. तामिळनाडूच्या सेलममध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमाला संबाेधित केले.
माेदी करणार काेलकाता मेट्राेच्या नाेआपारा-दक्षिणेश्वर मार्गाचे उद्घाटन
पंतप्रधान साेमवारी काेलकाता मेट्राेच्या नाेआपारा-दक्षिणेश्वर मार्गाचे उद्घाटन करतील. हुगळीमध्ये एका जाहीर सभेला मार्गदर्शन करतील. त्यानंतर आसामचे धीमाजीमधील जाहीर सभेला संबाेधित करतील. आसामशी संबंधित काही विकास याेजनांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते हाेणार आहे. यात सिलापाथरमध्ये तेल आणि गॅससारखे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. आसाममध्ये बंगालसाेबतच विधानसभा निवडणूक हाेणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.